शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

कर्जमाफी : केवळ ४ हजार लाभार्थी!, यादीच्या घोळात अडकली प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 06:35 IST

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अजूनही याद्यांच्या घोळातच अडकली आहे.

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अजूनही याद्यांच्या घोळातच अडकली आहे. आतापर्यंत ५५ हजार शेतकºयांच्या खात्यांवर कर्जमाफीचे ३७० कोटी जमा झाले आहेत, असा दावा सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केला असला, तरी मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत केवळ चार हजार ४७० शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. दिवाळीपूर्वी ज्या शेतकºयांना मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले होते, त्यांचेही खाते अद्याप बेबाक झालेले नाही.कर्जमाफीसंदर्भात ‘लोकमत’ने जिल्हानिहाय आढावा घेतला असता मिळालेली माहिती धक्कादायक आहे. विदर्भातील एकाही शेतकºयाच्या नावे अद्याप कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. यवतमाळ जिल्ह्यातील २ लाख ४० हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असताना, बँक अधिकारी, सहकार खात्यातील कर्मचारी आणि आयटी विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका शेतकºयांना बसला. यवतमाळ जिल्ह्याचा चुकीचा अहवाल दिला गेल्याने आलेले पैसे परत गेले! सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या ऊसपट्ट्यातील शेतकरी कर्जमाफीच्या एका जाचक अटीत अडकले आहेत. प्रोत्साहनपर अनुदान योजनेसाठी संबंधित शेतकºयाने २०१६-१७ या आर्थिक वर्षातील कर्जाची जुलै २०१७ पर्यंत परतफेड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण जुलैपासून जानेवारीपर्यंत पीक कर्जाची उचल केली जाते. त्यामुळे जानेवारी, फेबु्रवारीमध्ये उचल केलेल्या कर्जाची जुलैमध्ये परतफेड कशी करायची, असा प्रश्न ऊसउत्पादक शेतकºयांना पडला आहे.>अर्ज न करताही यादीत नाव!कोल्हापूर जिल्ह्यातील २१ हजार शेतकºयांची नावे पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली. मात्र त्यामध्ये ज्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केलेच नाही, अशा अनेक शेतकºयांचीही नावे होती. सहकार विभागाने तपासणी केल्यानंतर ही यादी आयटी विभागाने मागे घेतली.तणावाने अधिकारी अस्वस्थ : सॉफ्टवेअरमध्ये बदल करता येत नाही आणि जलदगतीने माहिती अपलोड करता येत नसल्याने याद्यांना विलंब होत आहे. त्याचा दबाव सहकार व जिल्हा बँकेच्या अधिकाºयांवर आहे. एका सहायक निबंधकाला थेट आयसीयूमध्ये दाखल करावे लागले.>प्रमाणपत्रेमिळाली तरी...!सरकारने दिवाळीपूर्वी प्रातिनिधिक स्वरूपात१५० शेतकºयांचा जिल्हा पातळीवर तर १० शेतकºयांचा थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे दिली. मात्र महिना उलटून गेला तरी त्यांचा सातबारा कोरा झालेला नाही.>प्रत्यक्ष कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांची जिल्हानिहाय संख्यामराठवाड्यातील अनेकनावे चुकल्यामुळे ग्रीन लिस्टमध्ये त्यांचा समावेश होऊ शकलेला नाही, तर बोटांचे ठसे न उमटल्याने अनेकांना फटका बसला.>जोपर्यंत कर्जमाफीचीसंपूर्ण रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा होणार नाही, तोपर्यंत नागपूरचे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही.- अजित पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

टॅग्स :FarmerशेतकरीMumbaiमुंबई