शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात विकासाच्या नावाखाली कर्जाचा सापळा; जयंत पाटील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 12:06 IST

कर्ज झाले तिप्पट, लोकहिताच्या योजनांना लावली कात्री, कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३१ पर्यंत मुदतवाढ द्या

मुंबई : राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प ‘भ्रमाचा दस्तऐवज’ असल्याचा आरोप शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. राज्य आर्थिकदृष्ट्या कमतरतेच्या संकटाकडे वाटचाल करत असल्याचा इशारा देत प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ९ मार्चऐवजी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी केली.

विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी बोलताना जयंत पाटील यांनी ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य अवास्तव असल्याचे म्हटले. राज्याची अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत सुमारे ५.५ ट्रिलियन डॉलर (सुमारे ४५० लाख कोटी) करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. मात्र सध्या विकास दर केवळ ०.५५ ट्रिलियन डॉलर (५० लाख कोटी) आहे. लक्ष्य गाठण्यासाठी पुढील २१ वर्षे दरवर्षी विकास दर ११.५ टक्के आवश्यक आहे. प्रत्यक्षात गेल्या वर्षी विकास दर ७.३ टक्के होता आणि २०२५-२६ साठी ७.९ टक्के अंदाज आहे. घोषणा आणि कृती यामध्ये मोठी दरी आहे, असे ते म्हणाले.

राज्यावरील कर्जाचा डोंगर गेला ११ लाख कोटींवर

१. राज्याचे कर्ज झपाट्याने वाढत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. २०२१-२२ मध्ये ५.७६ लाख कोटींचे कर्ज आता ११ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. 

२. यात एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सिडको या महामंडळाच्या कर्जाची बेरीज केली तर कर्जाची मर्यादा किती तरी पुढे जाईल. आमचा कर्ज काढायला विरोध नाही, पण ज्या कारणांसाठी कर्ज काढले जाते त्याला विरोध आहे. कर्ज काढण्यामागचा हेतू मला शुद्ध दिसत नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

ग्रामीण भागावर अन्याय

महसूल तूट ३७ हजार कोटी रुपये दाखवली असली तरी पूरक मागण्यांसह प्रत्यक्ष दायित्व सुमारे १.९० लाख कोटी रुपये आहे. अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी विभागांना दिलाच जात नाही, त्यामुळे ग्रामीण विकासावर अन्याय झाला आहे.

शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांमध्ये कपात झाली आहे. पीक विमा, नमो शेतकरी सन्मान योजना आणि पशुसंवर्धन विभागाच्या निधीत घट झाली आहे. दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीची मर्यादा २०१९ पासून बदललेली नाही, तर राज्याचे कर्ज मात्र तिप्पट झाले आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.

परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा निधी ४० कोटींवरून १५ कोटींवर आला आहे. तांत्रिक शिक्षणासाठीचा निधी १६०० कोटींवरून ३०० कोटींवर आला. आरोग्य खात्याच्या अर्थसंकल्पात मागील सुधारित अंदाजाच्या तुलनेत १२.५ टक्के कपात झाल्याचे त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Loan trap in budget under guise of development: Jayant Patil's criticism.

Web Summary : Jayant Patil criticized the state budget as a deceptive document, warning of financial crisis. He highlighted rising debt, cuts in farmer schemes, and reduced funding for education and healthcare, alleging rural injustice and questioning the government's intentions behind borrowing.
टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMaharashtraमहाराष्ट्र