कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 12:12 IST2019-06-04T12:11:54+5:302019-06-04T12:12:17+5:30
जळगाव : डोक्यावरील कर्जामुळे हताश झालेल्या युवराज महादू चव्हाण (४२, रा. धानवड ता. जळगाव )या शेतकºयाने स्वत:च्या शेतात गळफास ...

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव : डोक्यावरील कर्जामुळे हताश झालेल्या युवराज महादू चव्हाण (४२, रा. धानवड ता. जळगाव)या शेतकºयाने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चव्हाण यांच्याकड साडे तीन एकर शेती आहे. त्यांनी विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्ज काढले होते तर काही खासगी कर्ज होते. कर्जाचा डोंगर वाढतच चालला होता. त्यामुळे चव्हाण गेल्या आठ दिवसापासून तणावात होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.