शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

संख्यावाचनाच्या नव्या पद्धतीवरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 5:02 AM

मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात संख्यावाचनात केलेल्या बदलावरून नवा वाद उभा ठाकला आहे.

पुणे : मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात संख्यावाचनात केलेल्या बदलावरून नवा वाद उभा ठाकला आहे. त्यामुळे मराठी भाषेची मोडतोड होत असल्याची टीका मराठी भाषासमर्थक, साहित्य वर्तुळातून होत आहे. तर हा बदल मागील वर्षी इयत्ता पहिलीपासूनच केला आहे, त्यामुळे टीका करणाऱ्यांनी किमान पहिली आणि दुसरीची पुस्तके चाळावीत, अशा शब्दांत ‘बालभारती’च्या गणित विषयतज्ज्ञ समितीच्या अध्यक्षा डॉ. मंगला नारळीकर यांनी त्यास उत्तर दिले आहे. ‘बालभारती’तर्फे गणिताच्या पुस्तकात २१ ते ९९ या संख्यांचे वाचन व लेखन यात बदल केला आहे. तेवीसऐवजी वीस तीन, सत्त्याण्णवऐवजी नव्वद सात अशा प्रकारे वाचन व लेखन शिकवले जाणार आहे. काही विद्यार्थी पारंपरिक पद्धतीने गणित शिकले असतील. त्यामुळे दोन्ही प्रकारचे शब्द ग्राह्य धरावेत. शब्दात संख्या लिहिताना विद्यार्थ्यांना नवी पद्धत सोपी असल्याचे अनुभवता येईल, असे ‘बालभारती’तर्फे पुस्तकाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आले आहे.डॉ. मंगला नारळीकर म्हणाल्या की, इंग्रजी व चार दाक्षिणात्य भाषांमध्येही संख्या वाचन असेच केले जाते. पण हे त्यांचे अनुकरण नसून ते सोपे वाटले म्हणून घेतले आहे. त्यामागे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करणे, हा एकमेव उद्देश आहे. तर, हे इंग्रजी लॉबीचे कारस्थान दिसते आहे. हे त्वरित थांबवण्यासाठी शासनाला निवेदन पाठवण्याची गरज असल्याचे साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी सांगितले.

गणिताच्या अभ्यासक्रमातील संख्यावाचनाच्या निर्णयाचे आपण स्वागत केले पाहिजे. गणिताबद्दल विनाकारण भीती निर्माण होते. त्यामुळे मुलांची मानसिकता समजून घेऊन हा बदल केला आहे. संख्याबदल हा गणिताचा विषय आहे. साहित्यिकांचा थेट गणिताशी संबंध येत नसल्याने त्यांनी विरोध करण्यात अर्थ नाही.- लक्ष्मीकांत देशमुख, माजी संमेलनाध्यक्ष

पाठ्यपुस्तक मंडळाच्या दोन्हीपैकी एक निवडा, या भूमिकेस विरोध आहे. शिकताना सत्तर तीन त्र्याहत्तर चालेल, पण संख्या त्र्याहत्तरच म्हणावी. ग्रामीण भागात शाळेत न गेलेल्या महिलांनाही शंभरपर्यंत आकडे येतात. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकोबांची मराठी संपवू नका. - रामदास फुटाणे, साहित्यिक

टॅग्स :Schoolशाळा