शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

दोन सुपुत्रांना वीर मरण !

By admin | Updated: January 28, 2017 02:09 IST

अकोल्यात शोककळा; पंचशील नगरमधील आनंद गवई, मानाचे संजय खंडारे शहीद.

अकोला, दि. २७- जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात अकोला जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले. यामध्ये अकोल्यातील पंचशील नगर भागातील आनंद गवई आणि मूर्तिजापूर तालुक्यातील माना गावचे संजय खंडारे या सैनिकांचा समावेश आहे. ही बातमी कळताच जिल्हाभरातून शोक व्यक्त करण्यात आला. हे दोन्ही सुपुत्र शहीद झाल्याची बातमी कळताच अकोल्यातील पंचशील नगर व माना हे लहानसे गाव पार दु:खात बुडाले. अकोल्यातील वाशिम बायपास परिसरात पंचशील नगर आहे. सध्या या भागात स्मशान शांतता आहे. या स्मशान शांततेचे कारण आहे, या नगराचा सुपुत्र असलेल्या आनंद गवई या सैनिकाला आलेले वीर मरण. याच भागातील गल्ल्यांमध्ये खेळलेला, बागडलेला आनंद आता आपल्याला कधीच भेटणार नाही, यावर त्याचे मित्र अन् मोहल्ल्यातील कुणाचाच विश्‍वास बसत नाही आहे. आनंद २00८ मध्ये सैन्यामध्ये भरती झाला होता. अकोल्यातील पंचशील नगर भागात राहत असलेल्या आनंदच्या कुटुंबात त्याचे वडील काशीराम आणि गोकर्णा आणि महाराष्ट्र पोलिसांत असलेला त्याच्या मोठा भाऊ धनंजय यांचा समावेश आहे. त्याला चार बहिणी असून सर्वांंचे लग्न झाले आहेत. यावर्षी आनंदचा लग्न करण्याचा विचार होता. महिनाभरापूर्वी आलेल्या २0 दिवसाच्या सुटीत त्याने काही स्थळंही बघितली होती. दोन आठवड्यांनी तो सुटीवर आल्यानंतर घरचे त्याच्या लग्नाची तयारी करणार होते; मात्र त्याला वीर मरण आले. त्याच्या अनेक आठवणींनी त्याचे मित्र सध्या पार गहिवरून गेले. आनंदचा मित्र करण वानखडे, करण, सागर तायडे, शिव तेलगोटे म्हणाले, की आनंद प्रत्येक सुटीत आल्यावर प्रत्येकाच्या सुख-दु:खात सहभागी होत असे. तसेच सैनिकी आयुष्याच्या कथा सांगत असते. आज ही बातमी ऐकून सर्वच जण नि:शब्द झालोत. अशीच भावना पंचशील नगरमधील प्रत्येकाची आहे. आनंदचा मृतदेह अकोल्यात कधी येईल, यासंदर्भात सध्या कोणतीच माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली नाही.सुटीवर येण्यापूर्वीच काळाची झडप ! माना : बर्फवृष्टीमुळे रद्द झालेली सुटी, गावी जाण्याचा आनंद नियतीने हिरावल्याची घटना माना येथील जवान संजय सुरेश खंडारे यांच्याबरोबर घडली. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या छावणीवर हिमस्खलन झाल्याच्या घटनेत माना येथील जवान संजय सुरेश खंडारे (वय २६) हे शहीद झाले. जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेले खंडारे हे देशाची सेवा करण्याच्या इराद्याने २00९ मध्ये लष्कारात दाखल झाले होते. त्यांनी २१ जानेवारीपासून सुटी मागितली होती; मात्र जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे त्यांची सुटी रद्द झाली होती. सुटीत गावी येण्याचे त्यांचे स्वप्न स्वप्नच राहिले. २५ जानेवारी रोजी झालेल्या अपघातात त्यांना वीर मरण आले.