कुंभमेळ्यावरुन परतणा-या तिघा भाविकांचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2015 14:43 IST2015-09-13T12:28:57+5:302015-09-13T14:43:26+5:30
कुंभमेळ्याहून परतणा-या सिल्वासातील तिघा भाविकांचा नाशिक पेठ बलसाड रस्त्यावरील अपघातात दुर्दैवी अंत झाला. ट्रक व सँट्रो कारमध्ये झालेल्या या अपघातात चार जण जखमी झाले आहेत.

कुंभमेळ्यावरुन परतणा-या तिघा भाविकांचा अपघातात मृत्यू
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १३ - कुंभमेळ्याहून परतणा-या सिल्वासातील तिघा भाविकांचा नाशिक पेठ बलसाड रस्त्यावरील अपघातात दुर्दैवी अंत झाला. ट्रक व सँट्रो कारमध्ये झालेल्या या अपघातात चार जण जखमी झाले आहेत.
रविवारी सकाळी सिल्वासा येथील भाविक कुंभमेळ्यात शाहीस्नान आटपून माघारी परतत होते. यादरम्यान रासेगाव येथे सँट्रो गाडीला ट्रकने धडक दिली. दुचाकीसोबतची धडक टाळण्याचा प्रयत्न करत असताना कार समोरुन येणा-या ट्रकला जाऊन धडकली. या भीषण अपघातात तिघा भाविकांचा मृत्यू झाला तर चार भाविक जखमी झाले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोविंद (वय ३२), आयना पारीख (वय १० वर्ष), श्रवणकुमार (वय ३२ वर्ष) अशी या तिघा मृतांची नावे आहेत.