अंत्यसंस्काराची तयारी करताना तरुणाचा मृत्यू
By Admin | Updated: August 9, 2016 21:51 IST2016-08-09T21:51:34+5:302016-08-09T21:51:34+5:30
भाडेकरूच्या अंत्यसंस्काराची तयारी करणा-या घरमालक तरुणाला विजेचा जोरदार करंट लागल्याने त्याचा करुण अंत झाला. मानेवाडा रिंगरोडवरील धाडीवाल लेआऊटमध्ये

अंत्यसंस्काराची तयारी करताना तरुणाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 09 - भाडेकरूच्या अंत्यसंस्काराची तयारी करणा-या घरमालक तरुणाला विजेचा जोरदार करंट लागल्याने त्याचा करुण अंत झाला. मानेवाडा रिंगरोडवरील धाडीवाल लेआऊटमध्ये मंगळवारी सकाळी ९ ते ९.१५ च्या सुमारास ही करुणाजनक घटना घडली.
विपूल विनोद चहांदे (वय २०) असे मृताचे नाव आहे. शताब्दी चौकाजवळ धाडीवाल लेआऊटमध्ये राहणा-या चहांदे यांच्या घरी श्रीकृष्ण उबाळे भाड्याने राहत होते. त्यांचे निधन झाल्यामुळे चहांदे पिता-पुत्राने घरासमोर मंडप बांधून अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. सकाळी ९. १५ च्या सुमारास कापडाचा पाल बांधताना सर्व्हीस लाईनला चुकीने स्पर्ष झाल्यामुळे विपूलला जोरदार करंट लागला. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. अजनी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली.