पुण्यात नाल्यात वाहून गेलेल्या मुलाचा मृत्यू

By admin | Published: January 8, 2017 11:08 AM2017-01-08T11:08:20+5:302017-01-08T12:21:21+5:30

पाण्याच्या प्रवाहासोबत ड्रेनेज चेंबरमध्ये मित्रांसोबत खेळताना वाहून गेलेल्या 14 वर्षीय गणेश किशोर चांदणे याचा मृतदेह कसबा पेठ पंपिंग स्टेशनजवळ ड्रेनेजमधून बाहेर

The death of the son who died in a nullah in Pune | पुण्यात नाल्यात वाहून गेलेल्या मुलाचा मृत्यू

पुण्यात नाल्यात वाहून गेलेल्या मुलाचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 8 -  पाण्याच्या प्रवाहासोबत ड्रेनेज चेंबरमध्ये  मित्रांसोबत खेळताना वाहून गेलेल्या 14 वर्षीय गणेश किशोर चांदणे याचा मृतदेह कसबा पेठ पंपिंग स्टेशनजवळ ड्रेनेजमधून बाहेर आला आहे. शनिवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास दांडेकर पुलाजवळील अंबिल ओढा नाल्यामध्ये हा मुलगा वाहून गेला होता. त्यानंतर शनिवारी सकाळी 11 वाजेपासून शोधकार्य सुरू होते. अग्निशामक दल आणि सांडपाणी विभागाकडून मुलाचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले होते मात्र , मुलाचा शोध लागू शकलेला नव्हता.
 
गणेश किशोर चांदणे (वय 14, रा. दांडेकर पुल वसाहत) असे मृत मुलाचे नाव आहे. अग्निशामक दलाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश त्याच्या मित्रांसह नाल्यामध्ये खेळत होता. त्यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. पाय घसरल्यामुळे खाली पडलेला गणेश प्रवाहासोबत वाहत चेंबरपर्यंत गेला. चेंबरला पडलेल्या मोठ्या भगदाडामधून तो खाली पडला. ड्रेनेज पाईपमधून तो वाहत गेल्याचं सांगितलं जात आहे.  तीन बंब, जेसीबी आणि आधुनिक साधनांच्या सहाय्याने त्याचा शोध घेण्यात आला होता. अखेर आज सकाळी  कसबा पेठ पंपिंग स्टेशनजवळ ड्रेनेजमधून त्याचा मृतदेह बाहेर आला.
 
 

Web Title: The death of the son who died in a nullah in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.