अल्पवयीन मुलावर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा
By Admin | Updated: September 22, 2016 19:14 IST2016-09-22T19:14:17+5:302016-09-22T19:14:17+5:30
आठ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करुन त्याचा गळा दाबून खून करणा-या खलकसिंग जनकसिंग पांचाळ मरेपर्यंत फाशीची व जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

अल्पवयीन मुलावर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा
ऑनलाइन लोकमत
चाकण, दि. : आठ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करुन त्याचा गळा दाबून खून करणा-या खलकसिंग जनकसिंग पांचाळ या ३५ वर्षीय तरुणास राजगुरुनगर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी मरेपर्यंत फाशीची व जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कडाचीवाडी, चाकण, ता.खेड, जि.पुणे येथे पी के कॉलेजच्या पाठीमागील शेतात १५ मे २०१३ रोजी ही घटना घडली होती. रोहित उर्फ सोनू गोरख डुकरे असे मयत मुलाचे नाव आहे.
आरोपीने यापुर्वीही २६ सप्टेंबर २०११ रोजी न-हे, ता. मुळशी, जि. पुणे येथे एका बांधकामावर काम करीत असलेल्या कटुंबातील आठ वर्षाच्या मुलाचाहि खून केला होता. बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत या न्यायालयाने दिलेली ही पहिलीच गंभीर शिक्षा आहे. त्याचा तपास पोलिस निरीक्षक सुशिल कदम व सहायक पोलिस निरिक्षक कुमार कदम यांनी केला होता.