खेळाडूचा ह्रदयविकाराचा झटक्याने मृत्यू
By Admin | Updated: September 15, 2016 01:48 IST2016-09-15T01:48:09+5:302016-09-15T01:48:09+5:30
शेगाव तालुक्यातील चिंचोली येथील घटना.

खेळाडूचा ह्रदयविकाराचा झटक्याने मृत्यू
शेगाव (जि.बुलडाणा), दि. १४ : क्रिकेटचा सराव करत असताना खामगाव येथील २३ वर्षीय युवकाचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी ७.३0 वाजताच्या दरम्यान तालुक्यातील चिंचोली येथील माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर घडली.
मृतक युवक शुभम सुभाषचंद्र राठी (२३ रा. रॅलीज प्लॉट, खामगाव) येथील माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयाचा एम.ई. विद्याथ्र्यी होता. त्याची विद्यापीठाअंतर्गत होणार्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली होती. सरावाच्या दृष्टीने शुभम बुधवारी महाविद्यालयाच्या मैदानावर धावत असताना शुभमच्या छातीत दुखले. त्यानंतर उलटी होवून तो बेशुध्द झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शुभम राठी याला उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता शुभम मृत झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.