देशातील सर्वात वयोवृद्ध पुरुषाचा अखेर मृत्यू
By Admin | Updated: May 8, 2014 02:43 IST2014-05-07T20:35:34+5:302014-05-08T02:43:16+5:30
पालघर तालुक्याचे सुपुत्र रघुनाथ जीवन राऊत उर्फ रामानंद स्वामी यांचे अखेर काल सायंकाळी वयाच्या ११० वर्षे ३५९ व्या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले.

देशातील सर्वात वयोवृद्ध पुरुषाचा अखेर मृत्यू
पालघर : पालघर तालुक्याचे सुपुत्र रघुनाथ जीवन राऊत उर्फ रामानंद स्वामी यांचे अखेर काल सायंकाळी वयाच्या ११० वर्षे ३५९ व्या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज माकूणसार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
जगातील केवळ चारच लोकांना १११ वर्षे वयाचे जीवनभाग्य लाभलेले असून पालघर (माकूणसार) येथील रघुनाथ जीवन राऊत यांचे काल वयाच्या १११ व्या वर्षी पूर्ण होण्यास केवळ सहा दिवस बाकी असताना निधन झाले. रघुनाथ जीवन राऊत उर्फ रामानंद स्वामी यांचा माकूणसार येथील शेतकरी कुटंुबात १२ मे १९०३ रोजी जन्म झाला होता. बलदंड शरीरयष्टी प्रसन्न मुद्रा असलेले राऊत यांनी वयाच्या नवव्या वर्षी पद्मनाभ पंथाची दिक्षा घेतली होती. शेतकरी कुटुंबातील राऊत यांचा दुधाचा धंदा होता व भल्या पहाटे ते मुंबई येथे दूध घेवून जात असत. रघुनाथ राऊत यांनी १९४२ च्या चळवळीतही सहभाग घेतला होता. जगातील सर्वाधिक वयाचे इटलीचे अर्तुग लिकारा यांचे २३ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्याच्या ११२ वा वाढदिवस साजरा होण्यासाठी केवळ आठ दिवस बाकी होते. लिकारा यांचा जन्म २ मे १९०२ रोजी झाला होता. (वार्ताहर)