विजेच्या धक्क्याने जळगावच्या विवाहितेचा मृत्यू

By Admin | Updated: July 7, 2016 13:09 IST2016-07-07T13:09:00+5:302016-07-07T13:09:15+5:30

आजारी वडिलांच्या सेवेसाठी माहेरी आलेल्या महिलेचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना जळगावमध्ये घडली.

Death of Jalgaon's wife by electric shock | विजेच्या धक्क्याने जळगावच्या विवाहितेचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने जळगावच्या विवाहितेचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. ७ -  आजारी वडिलांच्या सेवेसाठी माहेरी आलेल्या लिना रमेश कोळी (सपकाळे) या विवाहितेचा शिरसोली (प्र.बो.) येथे विजेच्या धक्कयाने गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता मृत्यू झाला.
शिरसोली येथील नामदेव सुपडू कोळी हे आजारी आहेत तर त्यांच्या पत्नी बेबाबाई या बाहेरगावी गेल्या आहेत. त्यामुळे आई येईपर्यंत आजारपणात वडिलांची सेवा करण्यासाठी लिना ही चार दिवसापूर्वीच शिरसोलीत आली होती. गुरुवारी सकाळी आठ वाजता हिटर लावलेले पाणी गरम झाले की नाही हे पाहण्यासाठी तिने पाण्यात हात घातला असता तिला विजेचा धक्का बसला. वीजप्रवाह सुरुच राहिल्याने ही दुर्घटना घडली. शेजारील लोकांनी तिला तातडीने जळगावला आणले, मात्र रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

Web Title: Death of Jalgaon's wife by electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.