पिंपरीमध्ये कारच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू

By Admin | Updated: December 26, 2016 13:12 IST2016-12-26T13:12:42+5:302016-12-26T13:12:42+5:30

शाहूनगर परिसरात सकाळी कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू झाला.

Death of husband and wife in Pimpri's car | पिंपरीमध्ये कारच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू

पिंपरीमध्ये कारच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू

 ऑनलाइन लोकमत 

पिंपरी चिंचवड, दि. 26 -  शाहूनगर परिसरात  सकाळी कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू झाला. हा अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. या घटनेत कारचालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अनिल मधुकर बंडगर (वय 50) , नीलम अनिल बंडगर  (वय 45, रा. पंतनगर, जाधववाडी, चिखली) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दांम्पत्याचे नाव आहे.  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलम बंडगर या शाहूनगर येथे योगा क्लाससाठी जात होत्या. सोमवारी सकाळी अनिल बंडगर त्यांना क्लासला सोडावयला जात होते. त्यावेळी पिंपरीकडून येणा-या पुलावरुन भरधाव आलेल्या 'स्विफ्ट' मोटारीने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. बंडगर दाम्पत्यांना एक मुलगी आहे. 

Web Title: Death of husband and wife in Pimpri's car