बीड, दि. 23 - चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेवराई शहरातील गणेश नगरमधील ही घटना आहे. आदिनाथ घाडगे आणि अल्का घाडगे अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. पहाटेच्या सुमारास हे चोरटे घाडगे कुटुंबीयांच्या घरात शिरले. यावेळी आदिनाथ घाडगे, अल्का घाडगे व त्यांच्या दोन मुली घरात होत्या. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत त्यांच्या दोन मुलीदेखील जखमी झाल्या आहेत. एकीची प्रकृती गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरवस्तीत हा प्रकार घडल्यानं परिसरात दहशत निर्माण झाली आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळ दाखल झाले असून घटनेचा तपास करत आहे.
चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या चोरट्यांच्या मारहाणीत दाम्पत्याचा जागीच मृत्यू, मुलीची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 10:41 IST