सिलिंडर स्फोटात युवतीचा मृत्यू

By Admin | Updated: May 10, 2017 02:19 IST2017-05-10T02:19:36+5:302017-05-10T02:19:36+5:30

घरामध्ये साखरपुड्याची लगबग सुरु असताना गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन सतरा वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. शहरातील दत्तनगर भागात मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घटना घडली.

The death of the girl in the cylinder blast | सिलिंडर स्फोटात युवतीचा मृत्यू

सिलिंडर स्फोटात युवतीचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : घरामध्ये साखरपुड्याची लगबग सुरु असताना गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन सतरा वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. शहरातील दत्तनगर भागात मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घटना घडली.
मानवतकर यांच्या कुटुंबातील राधा अशोक मानवतकर हिचा विवाह लोणार तालुक्यातील दाभा येथे ठरला होता. आज साखरपुडा होता. सर्व पाहुणे मंडळी दाखल झाली होती. चहासाठी गॅस पेटविल्यानंतर सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट होताच सर्व जण जीव वाचविण्यासाठी घराबाहेर पडले. यावेळी घराने पेट घेतला. माला रमेश मानवतकर (१७) झोपलेली होती. तिच्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही त्यामुळे तिचा भाजून मृत्यू झाला.

Web Title: The death of the girl in the cylinder blast