गोळी लागून गॅंगस्टरच्या भावाचा मृत्यू
By Admin | Updated: August 13, 2016 14:50 IST2016-08-13T13:00:06+5:302016-08-13T14:50:17+5:30
वडाळा टर्मिनस येथे बंदुकीतून मिसफायरिंग होऊन एक तरूण जखमी झाला आहे.

गोळी लागून गॅंगस्टरच्या भावाचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - ऐसा गोली चलानेका...असे सांगून पिस्तूल चालविण्याचे प्रात्यक्षिक दाखवताना गोळी झाड़ली गेल्याने गॅंगस्टरच्या भावाचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना वडाळा टी टी येथे घडली. मंगल सिंग ठाकुर असे मृताचे नाव आहे.
हत्येच्या गुह्यात शिक्षा भोगत असलेल्या बच्चू सिंग याचे कुटुंबिय सायन प्रतीक्षा नगर मधील दुमजली घरात राहते. येथील दुसर्या मजल्यावर मंगल राहत होता. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. घरी आलेल्या मित्राला तो पिस्तूल चालविण्याचे प्रात्यक्षिक दाखवत होता. छातीवर पिस्तूल धरून प्रात्यक्षिक दाखवत असताना त्याचा पिस्तुलाचा चाप ओढला गेला. आणि गोळी झाड़ली गेली. यात सिंग गंभीर जखमी झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. सिंगला तत्काळ सायन रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी घटनेची नोंद करत अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते अशोक दूधे यांनी दिली.