मतदानासाठी आलेल्या वृद्धेचा मृत्यू

By Admin | Updated: February 21, 2017 16:27 IST2017-02-21T16:25:28+5:302017-02-21T16:27:11+5:30

खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या वृध्देला अस्वस्थ वाटू लागल्याने

Death of elderly voter | मतदानासाठी आलेल्या वृद्धेचा मृत्यू

मतदानासाठी आलेल्या वृद्धेचा मृत्यू

आॅनलाइन लोकमत
सातारा, दि. 21 : खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या वृध्देला अस्वस्थ वाटू लागल्याने खासगी दवाखान्यात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी करुन मृत घोषित केले. ठकुबाई एकनाथ नेवसे (वय ८३, रा. नायगाव ता. खंडाळा ) असे मृत वृध्देचे नाव आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत सातारा जिल्हापरिषदेसाठी 45 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

 

राज्यात दहा महानगरपालिका आणि 25 जिल्हापरिषदेसाठी आज मतदान होत आहे, सकाळ पासूनच मतदारांनी मतदान कऱण्यासाठी गर्दी केली आहे, राज्यात सर्व ठिकाणी भरघोस प्रतिसाद मिळत आहे. राज्यतील पालिका आमि जिल्हापरिषदेचा निकाल 23 तारखेला लागणार आहे. 

Web Title: Death of elderly voter