शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

जमिनीचा योग्य मोबदला मागणाऱ्या शेतकºयाचा उपोषणादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 06:43 IST

नेवासे तालुक्यातील पांढरीपूल येथील औद्योगिक वसाहतीसाठी जमिनी दिलेल्या शेतक-यांनी योग्य मोबदल्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणादरम्यान दादू साळवे (७२) या शेतक-याचा मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे.

- चेतन ननावरेमुंबई  - नेवासे तालुक्यातील पांढरीपूल येथील औद्योगिक वसाहतीसाठी जमिनी दिलेल्या शेतकºयांनी योग्य मोबदल्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणादरम्यान दादू साळवे (७२) या शेतकºयाचा मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे. या घटनेनंतर शेतकºयांना चर्चेसाठी बोलावण्याचे सरकारकडून सांगण्यात आले. मात्र १० दिवसांनंतर मागण्या मान्य होऊ शकत नसल्याचे सांगत सरकारने शेतकºयांची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलनकर्ते पांडुरंग होंडे यांनी केला आहे.पांढरीपूल येथील शासकीय औद्योगिक वसाहतीसाठी शिंगवेतुकाई, लोहगाव, वाघवाडी व झापवाडी येथील सुमारे १६० शेतकºयांच्या २५४ हेक्टर इतकी पिकाऊ जमीन १९९० ते १९९७ सालादरम्यान संपादित करण्यात आली. मात्र त्याचा योग्य मोबदला मिळाला नसल्याची तक्रार घेऊन या शेतकºयांनी १९ जानेवारीपासून आझाद मैदानात उपोषण सुरू केले. आठवडाभराच्या उपोषण आंदोलनामुळे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दादू साळवे यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे रात्रीच ते सपत्नीक वांजोळी या त्यांच्या गावी परतले. मात्र, प्रजासत्ताक दिनीच त्यांचा मृत्यू झाल्याचे आंदोलनकर्त्या शेतकºयांनी सांगितले.सरकारकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असून न्याय मिळणार नसेल, तर किमान स्वेच्छामरणाची परवानगी तरी द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.दादू साळवे यांची सहा एकर जमीन संपादित केल्यानंतर त्यांना १९९८ साली मोबदल्याचा पहिला हफ्ता देण्यात आला. मात्र दुसºया हफ्त्यासाठी त्यांना उपोषण करावे लागले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र या प्रकरणाची वाच्यता करू नका, असे उद्योगमंत्र्यांच्या पीएने सांगितले होते. १० दिवसांनंतर खुद्द उद्योगमंत्र्यांनी मागण्या फेटाळून लावत शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप होंडे यांनी केला आहे....ही तर शेतकºयांची फसवणूकमी दिव्यांग असून माझी दीड एकर शेती सरकारने संपादित करत त्याच्या मोबदल्याचा पहिला टप्पा म्हणून १७ मार्च १९९८ साली ३३ हजार ४३१ रुपये दिले. मोबदल्याचा दुसरा टप्पा २०१६ मध्ये व्याजासह ६५ हजार रुपये इतका देण्यात आला. एकीकडे समृद्धी मार्गासाठी एकरी ५० लाख रुपयांची मदत दिली जात असताना, सुपीक जमिनीला एकरी १५ हजार रुपयांनुसार मोबदला देत सरकार शेतकºयांची फसवणूक करीत आहे.- दामोधर पुंड, आंदोलनकर्ते शेतकरीन्याय देणारशेतकºयांप्रति सहानुभूती आहे. त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली आहे. ही भूसंपादनाची प्रक्रिया ३० वर्षांपूर्वीची असून गुंतागुंतीची आहे. त्यासंदर्भात घेतलेला निर्णय हा राज्यातील सर्वच भूसंपादन प्रकरणांना लागू होणार आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर चर्चा करून लवकरच निर्णय घेऊन शेतकºयांना न्याय दिला जाईल. - सुभाष देसाई, उद्योगमंत्री

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यू