रेल्वेतून पडून दोघांचा मृत्यू

By Admin | Updated: August 4, 2016 01:52 IST2016-08-04T01:52:12+5:302016-08-04T01:52:12+5:30

रबाळे ते ऐरोलीदरम्यान रेल्वे रुळालगत दोन मृतदेह मंगळवारी सकाळी आढळले.

The death of both of them died in the train | रेल्वेतून पडून दोघांचा मृत्यू

रेल्वेतून पडून दोघांचा मृत्यू


नवी मुंबई : रबाळे ते ऐरोलीदरम्यान रेल्वे रुळालगत दोन मृतदेह मंगळवारी सकाळी आढळले. त्यापैकी एकाची ओळख पटलेली असून, दुसऱ्याविषयी पोलिसांना कसलीच माहिती मिळालेली नाही. एकाच्या खिशात चिलीम आढळल्याने ते गर्दुल्ले असून, नशेतच रेल्वेतून पडल्याचा प्राथमिक अंदाज रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. रबाळे ते ऐरोली स्थानकांदरम्यान रुळालगतच्या पाण्याच्या चरीमध्ये मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दोन मृतदेह आढळले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवले असता, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)

Web Title: The death of both of them died in the train