पुण्यात वीज पडून १८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
By Admin | Updated: March 2, 2016 20:05 IST2016-03-02T20:05:58+5:302016-03-02T20:05:58+5:30
विमाननगर मध्ये सिम्बोईसिस लॉ कॉलेज जवळ वीज पडून एका १८ वर्षाच्या तरुणाचा मृत्यु झाला.

पुण्यात वीज पडून १८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २ -विमाननगर मध्ये सिम्बोईसिस लॉ कॉलेज जवळ वीज पडून एका १८ वर्षाच्या तरुणाचा मृत्यु झाला तर १ जण जखमी झाला. अक्षय विजय भालशंकर या मुलाचा मृत्यु झाला असून संतोष चांदणे हा जखमी झाला आहे. वीज कोसळली तेव्हा अक्षय मोबाइलवर गेम खेळत होता त्यामुळे वीज खेचली जाऊन अक्षयचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय.