अखेर मृतांची ओळख पटली
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:07+5:302016-06-07T07:43:07+5:30
कुणाचा हात, कुणाचा पाय, कुणाच्या शरीराचा अन्य अवयव, सारेच विखुरलेले...

अखेर मृतांची ओळख पटली
नागपूर : कुणाचा हात, कुणाचा पाय, कुणाच्या शरीराचा अन्य अवयव, सारेच विखुरलेले... पुलगाव येथील दारुगोळ्याच्या भीषण स्फोटात कर्मचाऱ्यांच्या देहाच्या छिंधड्या उडाल्या होत्या. त्या अवशेषांच्या विविध चाचण्या करून सहाही छिन्नविछिन्न मृतदेहांची ओळख पटविण्याचे आव्हान येथील प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील आठ जणांच्या चमूने अवघ्या ३६ तासांत पूर्ण केले. त्यामुळे आता त्यांच्या अखेरच्या मानवंदनेचा मार्ग मोकळा झाला आहे. पुलगाव केंद्रीय दारुगोळा भांडारात ३० मेच्या मध्यरात्री भीषण स्फोट झाला. यात कर्नल आणि मेजरसह १९ जणांचा मृत्यु झाला. ३ जूनला सहा मृतदेहांचे वेगवेगळे अवयव आणि त्यांच्या नातेवाईकांच्या रक्तमासाचे १८ नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.