शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

“नाथाभाऊंबाबत केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणे मान्य, गणपतीनंतर योग्य निर्णय घेतला जाईल”: फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 16:26 IST

BJP DCM Devendra Fadnavis On Eknath Khadse: एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

BJP DCM Devendra Fadnavis On Eknath Khadse: लोकसभा निवडणुकीपासून एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा आहे. केंद्रातील पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश झाला असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील काही भाजपा नेत्यांमुळे तो जाहीर करत नसल्याचा दावाही एकनाथ खडसे यांनी केला आहे. यातच एकनाथ खडसे यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला. यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही एक खुलासा केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

साधारण २०१९ मधील ही गोष्ट आहे. एक दिवशी देवेंद्र फडणवीसांनी बोलवले. आम्ही दोघेच होतो. देवेंद्र फडणवीस मला म्हणाले की, नाथाभाऊ तुमची राज्यपालपदासाठी शिफारस करतो. त्यावर त्यांना म्हणालो, देवेंद्रजी खरे सांगा, तुम्ही मला अनेकदा सांगितले की हे करणार, ते करणार, हे देणार वगैरे. पण, काही झाले नाही. त्यामुळे माझा विश्वास बसत नाही. राज्यपाल केले तर आनंदाची गोष्ट आहे, असे त्यांना सांगितले. यावर, ते म्हणाले की, माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो की, हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे. पुढे काय झाले मला माहिती नाही पण देवेंद्र फडणवीसांनी मला आश्वासन दिली होते, असा खळबळजनक दावा एकनाथ खडसे यांनी केला होता. पत्रकारांशी बोलताना याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.

गणेशोत्सवानंतर यासंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल

भाजपा प्रवेश झाला आहे, परंतु, त्याची घोषणा केली जात नाही, असा एकनाथ खडसे यांचा दावा असून, याबाबत देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ते काय म्हणाले, हे मी ऐकलेले नाही. मात्र, त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हा सर्वांना मान्यच आहे. केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गणेशोत्सवानंतर यासंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, ज्या वेळेस भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा माझी भाजपमध्ये जाण्याची इच्छा नव्हती.  दिल्लीतील अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन केला. दिल्लीत असताना  जे.पी.नड्डा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश झाला. रक्षा खडसे उपस्थित होत्या. माझ्या गळ्यात भाजपाचा मफलर घातला. या घटनेला ५ ते ६ महिने होऊन भाजपाने माझा प्रवेश झाल्याचे घोषित केले नाही. अजून वाट पाहतोय पण अजून काही घोषणा झाली नाही, असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसeknath khadseएकनाथ खडसेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस