शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
2
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
3
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
4
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
5
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
6
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
7
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
8
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
9
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
10
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
11
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
12
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
13
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
14
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
15
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
16
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
17
वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा
18
Video - "राहुल गांधींनी भाजपामध्ये सामील व्हावं, देवाने तुम्हाला..."; कंगना राणौतचा खोचक सल्ला
19
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
20
"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या दिवशीच नवरदेवावर काळाचा घाला! खांडवी-झाडेगाव मार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 22:25 IST

विवाह सोहळा आटोपून घरी परतत असलेल्या नवरदेव-नवरीच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात नवरदेव जागीच ठार झाला तर नवरी आणि सहा ते सात व-हाडी गंभीर जखमी झाले. ही घटना झाडेगाव- खांडवी मार्गावर बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

खामगाव: विवाह सोहळा आटोपून घरी परतत असलेल्या नवरदेव-नवरीच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात नवरदेव जागीच ठार झाला तर नवरी आणि सहा ते सात व-हाडी गंभीर जखमी झाले. ही घटना झाडेगाव- खांडवी मार्गावर बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

नांदुरा तालुक्यातील खैरा येथील श्यामराव कावणे यांच्या मंगेश (२५) नामक मुलाचा बुधवारी कुरणगाड येथील गजानन भाकरे यांच्या योगिता नामक मुलशी बुधवारी पार पडला. विवाह सोहळ्यानंतर व-हाडी नवरदेव -नवरीला घेवून एमएच १४ बीसी ४४८० या वाहनाने खैरा येथे परतत होते. त्याचवेळी खांडवी येथून झाडेगाव रस्त्यावर समोरून येणा-या एमएच २८ एच ९६८५  या मालवाहू वाहनाने  नवरदेव-नवरीच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, चालकाच्या पाठीमागे बसलेला नवरदेव चालू वाहनातून सुमारे दीडशे फूट अंतरावर फेकल्या गेला. सडकेचा जबर मार लागल्याने नवरदेव असलेला मंगेश जागीच गतप्राण झाला. तर या वाहनातील नवरी आणि इतर सहा ते सात नातेवाईक गंभीर जखमी झाले. जखमी असलेल्या नवरीला नांदुरा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या  अपघातात नवरदेवाच्या आत्या उषा श्रीराम गायकवाड यांच्यासह नवरीकडील कुरवल्या आणि नातेवाईक जखमी झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच खांडवी येथील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. नातेवाईकांचा आक्रोश आणि किंकाळ्यांनी समाजमन हेलावून गेले होते. वरातीत नाचणा-या मित्रांना आपल्या सोबत्याचा मृतदेह खांद्यावर उचलून नेण्याची क्रुर वेळ नियतीने  बुधवारी अनेकांवर आणली होती. गंभीर जखमीमध्ये अपघात ग्रस्त दोन्ही वाहनांच्या चालकांचा समावेश असून या वाहन चालकांवर नांदुरा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याघटनेमुळे खैरा आणि कुरणगाड या दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Accidentअपघात