शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

तहान भागविण्यासाठी रात्रंदिवस ‘झऱ्या’वर!

By admin | Updated: April 28, 2016 05:58 IST

अकोला-गावातील नळांना महिना-महिना पाणी येत नसल्याने जिल्ह्यातीलच खारपाणपट्ट्यातील बारुला भागात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे

संतोष येलकर,

अकोला-गावातील नळांना महिना-महिना पाणी येत नसल्याने जिल्ह्यातीलच खारपाणपट्ट्यातील बारुला भागात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना रात्रंदिवस ‘झऱ्यां’वर काढावा लागत आहे.जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील बारुलामध्ये अकोला तालुक्यातील आपोती बु., आपोती खुर्द , आपातापा, आखतवाडा, खोबरखेड, अनकवाडी, शामाबाद, सुलतान अजमपूर, नावखेड, लाखोंडा व घुसरवाडी इत्यादी १२ गावांचा समावेश आहे. खांबोरा ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत बारुलासह ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु अत्यल्प पाऊस झाल्याने, धरणाची जलपातळी खाली गेली आहे. परिणामी काटेपूर्णा धरणातील शिल्लक जलसाठा अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात आला असून, ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला.पाणीटंचाईच्या परिस्थितीत या गावांना सुकळी तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी कमी व्यासाची असल्याने, अनंत अडचणी निर्माण होत आहेत. या योजनेंतर्गत बारुलामधील गावांना २७ दिवस उलटले तरी पाणी मिळाले नाही. या भीषण पाणीटंचाईच्या परिस्थितीत ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी गावाबाहेरील लोणार नाल्यात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या ‘झऱ्यां’मधील पाण्याचा वापर करावा लागत आहे. बैलगाडी, सायकल, आॅटोरिक्षामध्ये पाण्याचे कॅन भरून ग्रामस्थ पाणी नेत आहेत; यासाठी महिला-पुरुषांना पायपीटही करावी लागत आहे.बारुलापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबिकापूर येथील बोअरचे पाणी विकत घेतले जात आहे. अशा प्रकारे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.