शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

एसटी, वीज कर्मचा-यांची दिन दिन दिवाळी! बोनसची घोषणा; पीएमपी कर्मचा-यांनाही १२ हजार रुपये बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 4:31 AM

राज्य परिवहन महामंडळ (एसटी), सरकारी वीज कंपन्या आणि पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचा-यांना भरघोस बोनसची घोषणा करण्यात आल्याने यंदा त्यांची दिवाळी विशेष उत्साहात जाणार आहे.

मुंबई : राज्य परिवहन महामंडळ (एसटी), सरकारी वीज कंपन्या आणि पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचा-यांना भरघोस बोनसची घोषणा करण्यात आल्याने यंदा त्यांची दिवाळी विशेष उत्साहात जाणार आहे. शासन-प्रशासनाच्या या घोषणेबद्दल कर्मचा-यांनी समाधान व्यक्त केले आहे.यानुसार एसटीतील अधिका-यांना ५ हजार आणि कर्मचा-यांना अडीच हजार रुपये बोनससह गतवर्षीच्या जुलै महिन्यापासूनच्या महागाई भत्त्याची थकबाकी देण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. यामुळे वेतनवाढ नसली तरी बोनस मिळाल्यामुळे कर्मचारी समाधानी आहेत.तसेच, कामगार संघटनांसोबत झालेल्या चर्चेनंतर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवाळीनिमित्त महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व सूत्रधारी कंपन्यांतील सुमारे ७७ हजार कर्मचाºयांना १३,५०० रुपयांचे आणि कंत्राटी कामगारांना ७,५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली.त्याचबरोबर पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचाºयांना ८.३३ टक्के बोनस आणि १२ हजार रुपये बक्षीस देण्याच्या निर्णय घेण्यात आला. पीएमपीच्या स्वारगेट येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. मात्र, पीएमपी तोट्यात असल्याने अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे बोनसची रक्कम घेणार नाहीत. कर्मचाºयांनाही बोनस न घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :diwaliदिवाळी