अनंत चतुर्दशीच्या दिवशी पश्चिम रेल्वेच्या विशेष लोकल

By Admin | Updated: September 3, 2014 01:36 IST2014-09-03T01:36:33+5:302014-09-03T01:36:33+5:30

अनंत चतुदर्शीच्या दिवशी विसर्जन करून मध्यरात्रीच्या सुमारास घरी परतणा:या गणोशभक्तांची गैरसोय होऊ नये, म्हणून पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत.

On the day of Anant Chaturdashi special local train of Western Railway | अनंत चतुर्दशीच्या दिवशी पश्चिम रेल्वेच्या विशेष लोकल

अनंत चतुर्दशीच्या दिवशी पश्चिम रेल्वेच्या विशेष लोकल

मुंबई : अनंत चतुदर्शीच्या दिवशी विसर्जन करून मध्यरात्रीच्या सुमारास घरी परतणा:या गणोशभक्तांची गैरसोय होऊ नये, म्हणून पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. चर्चगेट ते विरारदरम्यान अशा चार विशेष ट्रेन सोडण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. 
विरारसाठी यातील पहिली विशेष लोकल चर्चगेटहून मध्य रात्री सव्वाएक वाजता सुटेल. ही ट्रेन मध्यरात्री 2.47 वाजता विरारला पोहोचेल. दुसरी विशेष ट्रेन मध्यरात्री 1.55 वाजता, त्यानंतर तिसरी ट्रेन 2.25 वाजता तर 
चौथी विशेष ट्रेन चर्चगेटहून 3.20 वाजता सोडण्यात 
येणार आहे. चर्चगेटसाठी विशेष ट्रेन विरारहून मध्यरात्री सव्वाबारा वाजता सोडण्यात येईल. ही ट्रेन चर्चगेटला पावणोदोन वाजता पोहोचेल. तर त्यानंतर विरारहून पावणोएक, 1.40 आणि 2.55 वाजता ट्रेन सोडण्यात येणार आहे. या विशेष ट्रेन सर्व स्थानकांवर थांबणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

 

Web Title: On the day of Anant Chaturdashi special local train of Western Railway