शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

बर्नर फोनच्या माध्यमातून इक्बाल कासकर साधायचा दाऊदशी संवाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 2:32 PM

नुकताच अटक करण्यात आलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याने प्राथमिक चौकशीमध्ये आपला भाऊ दाऊद इब्राहीमशी संपर्क नसल्याचे सांगितले होते. मात्र आता त्याने दाऊद इब्राहीमसोबत फोनवरून संपर्क साधल्याचे मान्य केल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, दि. 24 - नुकताच अटक करण्यात आलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याने प्राथमिक चौकशीमध्ये आपला भाऊ दाऊद इब्राहीमशी संपर्क नसल्याचे सांगितले होते. मात्र आता त्याने दाऊद इब्राहीमसोबत फोनवरून संपर्क साधल्याचे मान्य केल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही भावांमी बर्नर फोनच्या मदतीने एकमेकांशी संपर्क साधल्याचे या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. इक्बाल कासकरला ठाण्यातील एका बिल्डरकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.  दरम्यान, कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम आणि इक्बाल कासकर हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. दोन्ही भावांमध्ये शेवटचे संभाषण भेंडीबाजार येथील हुसैनी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर झाले होते. या दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या शेजारीच इक्बाल कासकरचे घर आहे. मात्र त्याने सांगितेल्या माहितीमध्ये कितपत तथ्य आहे याबाबत तपासानंतरच माहिती मिळू शकेल असे, पोलिसांचे म्हणणे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कासकरने बर्नर फोन आणि सिम बॉक्सच्या मदतीने दाऊदशी संपर्क साधला होता. बर्नर फोन विशेष कामांसाठी तयार केले जातात. हे फोन काम पूर्ण झाल्यानंतर नष्ट केले जातात. तसेच सिमबॉक्स कॉलमुळे ओळख लपवण्यास मदत होते.   कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी दोन वर्षांपूर्वी चार वेळा बोलणे झाल्याचा दावा करणा-या इक्बाल कासकर याने आपण व्यसनाधीन असल्याने दाऊद आपल्यावर नाराज असल्याची माहिती शनिवारी पोलिसांना दिली होती. खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या कासकरच्या बँक अकाउंटबद्दल चौकशी केली असता आपले बँक अकाउंटच नसल्याची लोणकढी थापही त्याने मारली होती.बिल्डरकडून खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात अटकेत असलेला कासकर दररोज उलटसुलट दावे करत असून पोलिसांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. इक्बालने आपला भंगारचा धंदा असल्याचे सांगितले. तसेच तो राहत असलेल्या परिसरात त्याचा एक दुकानाचा गाळा असून त्याने तो भाड्याने दिला आहे. महिनाकाठी त्याचे ३० ते ४० हजार रुपये भाडे येते. त्यावरच आपला उदरनिर्वाह सुरू असल्याचा हास्यास्पद दावा त्याने केला आहे. आपल्याला वेगवेगळी व्यसने असून त्यामुळे दाऊद आपल्यावर नाराज असल्याचे त्याचे म्हणणे आहे. दाऊदबद्दल दररोज नवनवी तसेच परस्परविरोधी माहिती देऊन पोलिसांना गोंधळात टाकण्याची सराईत गुन्हेगाराची कार्यशैली कासकरने अवलंबली आहे.

बर्नर फोन म्हणजे नेमकं काय-

- हे फोन खास संभाषणासाठी तयार केले जातात.

-त्याचा एकदा वापर झाला की ते नष्ट केले जातात

- फोन करणाऱ्याची माहिती गुप्त ठेवण्यासाठी 'सिम बॉक्स'ची वापर केला जातो.

-व्हाईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलच्या साहाय्याने कॉल करण्यासाठी सिम बॉक्सचा वापर केला जातो

-त्यामुळे सुरक्षा संस्थांना ते टॅप करता येत नाहीत 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस