शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 23:56 IST

कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाणे गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. एका खंडणी प्रकरणामध्ये इक्बाल कासकरला अटक करण्यात आली आहे. इक्बाल कासकरने एका बिल्डरकडे खंडणी मागितली होती. 

ठाणे, दि. 18 - कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमचा धाकटा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाणे गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. एका खंडणी प्रकरणामध्ये इक्बाल कासकरला अटक करण्यात आली आहे. इक्बाल कासकरने एका बिल्डरकडे खंडणी मागितली होती, अशी प्राथमिक माहिती आहे. इक्बाल कासकरकडून खंडणी मागण्यात आल्याची तक्रार मिळाल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत इक्बाल कासकर याला अटक केली. ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी त्याला राहत्या घरातून अटक केली.मात्र मिळत असलेल्या माहितीनुसार इक्बाल कासकरने एका बिल्डरकडून चार फ्लॅट मिळवले होते. मात्र इक्बाल अजून फ्लॅटची मागणी करत होता. अखेर त्याच्याविरोधात मिळालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान इक्बाल याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

 कासकर याने ठाण्यातील बिल्डर खेतवानी यांच्याकडून खंडणीपोटी चार सदनिका वसूल केल्या होत्या. मात्र, त्याची भूक काही कमी न झाल्याने व तो आणखी सदनिकांची मागणी करत असल्याने बिल्डरने कासारवडवली पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार, शर्मा यांनी भायखळा येथील कासकरच्या घरी तो येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली. 

खेतवानी यांनी ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गृहप्रकल्प उभारला होता. या प्रकल्पाच्या जागेसंदर्भात वाद होता. या वादातूनच खेतवानी यांना खंडणी मागण्यात आली होती. सोमवारी खेतवानी यांनी तक्रार दिल्यानंतर ठाणे पोलिसांनी कारवाई केली. कासकरला त्याच्या भायखळा येथील निवासस्थानातून अटक करण्यासाठी तब्बल 40 पोलीस, 8 कमांडो आणि बुलेटप्रुफ गाड्यांचा ताफा पोलिसांनी वापरला. 

कासकर हा 2003 पर्यंत दुबईत वास्तव्य करीत होता. 19 मार्च 2003 रोजी त्याला विमानतळावर अटक करून त्याला मोक्का लावण्यात आला. दाऊदचे रिअल इस्टेटमधील व्यवहार सांभाळणा-या कासकरची 2007 मध्ये वेगवेगळ्या आरोपांतून पुराव्याअभावी मुक्तता झाली. 2010 मध्ये छोटा राजन टोळीने त्याच्या हत्येचा कट रचला होता. मात्र, तो पोलिसांनी उधळून लावला. भेंडीबाजार येथील पाकमोडिया स्ट्रीटवरील हुसैनी इमारत कोसळल्यानंतर भायखळा येथील डाबरवाला ही धोकादायक इमारत रिकामी करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले होते. त्यातच इमारतीत कासकर हा बेकायदा राहत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

इक्बालला अटक करणारे चकमक फेम अधिकारी म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा  गेल्या महिन्यात पुन्हा एकदा पोलिस सेवेत    रूजू झाले होते. त्यानंतर त्यांच्याकडे खंडणीविरोधी पथकाची जबाबदारी देण्यात आली होती. 1983 साली महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रूजू झालेल्या प्रदीप शर्माची कारकीर्द माहिम पोलीस ठाण्यापासून सुरू झाली. शंभरपेक्षा जास्त गुन्हेगारांना चकमकीत ठार केल्याने शर्माची ओळख सर्वदूर पोहोचली होती. गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याच्या आरोपाखाली 2008 साली त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. या आरोपातून दोषमुक्त झाल्यानंतर 2009 साली ते पुन्हा सेवेत रूजू झाले. जानेवारी 2010 मध्ये लखनभैय्या बनावट चकमक प्रकरणामध्ये शर्मासह 13 पोलिसांना अटक करण्यात आली होती. जुलै 2013 मध्ये न्यायालयाने त्यांना या प्रकरणातूनही दोषमुक्त केले होते. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस