शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

जातीपातीचे सिमोल्लंघन करणारा दसरा

By admin | Updated: October 10, 2016 15:25 IST

मागासवर्गीय महिलांना असतो श्रींच्या आरतीचा पहिला मान वडवळ-महेश कोटीवाले दसरा हा साडेतीन मुहूर्तपैकी एक शुभ मुहूर्त असलेला सण

ऑनलाइन लोकमतवडवळ, दि.10 -  मागासवर्गीय महिलांना असतो श्रींच्या आरतीचा पहिला मान वडवळ-महेश कोटीवाले दसरा हा साडेतीन मुहूर्तपैकी एक शुभ मुहूर्त असलेला सण ..सर्वत्र विजयादशमी म्हणून हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. वडवळ (ता मोहोळ) येथे असाच जातीपातीचे सिमोलनघंन करणारा दसरा हा सण १२ व्या शतकपासून साजरा केला जात आहे याला प्राचीन परंपरा आहेश्री नागनाथांची पालखी सिमोलंघनास आल्यानंतर आरती करण्याचा पहिला मान हा येथील मागासवर्गीय समाजाच्या महिलांना आहे या समाजातील महिला दसरा या दिवशी दिवसभर उपवास करतात रात्रि उशिरा श्री ची पालखी मारुती मंदिराजवळ आल्यानंतर त्या विविध प्रकारचा नैवैद्य दाखवतात मग आपला उपवास सोडतात ही प्रथा १२ व्या शतकापासून चालत आली असून सर्व जाती धर्माच्या लोकांना या नागेश संप्रदाय मधे सामावून घेतले असल्याचे मानकरी नागनाथ धनवे पाटिल,हनुमंत मोरे पाटिल,महादेव धनवे पाटिल,सखाराम मोरे पाटिल,मथुराबाई बनसोडे,केराप्पा बनसोडे,किसन बनसोडे, जालिंदर बनसोडे यांनी सांगितले.

असा होतो येथील दसरा साजरा दसऱ्या दिवशी सर्वत्र आकर्षक विद्युत् रोषणाई केलि जाते रांगोळी च्या पायघड्या घातल्या जातात मागासवर्गीय समाजातील पुरुष मंडळी" मुंगीचा धोंडा"येथे आपट्याची पाने आणून ठेवतात सायंकाळी धनवे व मोरे पाटील घराण्यातील पुरुष मंडळी हातात तलवार(शस्त्र)घेवून नागनाथ मंदिर येथून मुंगीचा धोंडा येथे येतात तिथे शस्त्रपूजन केल्यानंतर प्रतिनिधिक सोने लुटले जाते त्यानंतर सर्व जण नागनाथ मंदिरात जावून श्रींच्या चरणी सोने (आपट्याची पाने)अर्पण करतात मग सर्व जण एकमेकांना सोने देवून शुभेच्छा देतात रात्रि 9 च्या सुमारास मंदिरातील श्रींची मोठी मूर्ति पालखित बसवून संत मंडळी व ग्रामस्थ समवेत भजन करीत सिमोलंघनसाठी पालखी बाहेर येते मुंगीचा धोंडा येथून पा लखि मारुती मंदिराजवळ आल्यावर मागासवर्गीय समाजातील महिला प्रथम आरती करुण नैवैद्य दाखवतत त्यानंतर इतर समाजातील लोक आरती करतात.नागेश संप्रदाय हा सर्व जाती धर्माण सोबत घेवून जाणारा पंथ आहे श्री नागनाथ महाराजांनीच ही प्रथा १२ व्या शतकात सुरु केलि आहे तीच परंपरा आज ही जतन केलि जात आहे मागासवर्गीय समाजाला प्रथम आरतीचा मान म्हणजे देवाला सर्व भक्त समान च आहेत हा संदेश देणारा सण म्हणजे दसरा होय"- महादेव धनवे-पाटील- मानकरी वडवळ