मनसेतील बंडखोरीमुळे राज ठाकरेंची संमेलनाला दांडी

By Admin | Updated: February 3, 2017 12:56 IST2017-02-03T12:56:04+5:302017-02-03T12:56:04+5:30

मनसेतही बंडखोरी असल्याने उमेदवारी वाटपात व्यस्त असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साहित्य संमेलनाला दांडी मारली, अशी चर्चा साहित्य नगरीत सुरू आहे.

Dandi due to MNS rebellion: Raj Thackeray | मनसेतील बंडखोरीमुळे राज ठाकरेंची संमेलनाला दांडी

मनसेतील बंडखोरीमुळे राज ठाकरेंची संमेलनाला दांडी

ऑनलाइन लोकमत

पु. भा. भावे साहित्यनगरी/डोंबिवली, दि. 3 - महापालिका निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. त्यात विविध पक्षांप्रमाणेच मनसेतही बंडखोरी असल्याने उमेदवारी वाटपात व्यस्त असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साहित्य संमेलनाला दांडी मारली, अशी चर्चा साहित्य नगरीत सुरू आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्घाटन सोहळ्याला आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्याला हजर राहणार आहेत. त्यातच मनसेच्या स्थानिक नेत्यांनी मदत करताना गळ घातल्याने राज ठाकरे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचे ठरले होते.
 
मात्र प्रत्यक्ष सोहळ्यावेळी राज यांनी दांडी मारली. याबाबत आयोजकांनी फारसा तपशील दिला नाही. त्यांना जमले नाही, एवढेच ते सांगत होते. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही राज ठाकरे यांच्या दांडीचे कारण जाहीर केले नाही. पालिका निवडणुकांमुळे जमले नसल्याचे ते नंतर सांगत होते. 
 

Web Title: Dandi due to MNS rebellion: Raj Thackeray