शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

‘सार्वजनिक बांधकाम’ची नाचक्की!

By admin | Updated: November 11, 2015 02:16 IST

चीनचे उपराष्ट्रपती ली. इयानचो यांच्या अजिंठा लेण्यांना दिलेल्या भेटीच्या दौऱ्यात खड्डेमय औरंगाबाद- अजिंठा रस्त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची नाचक्की झाली आहे.

विकास राऊत , औरंगाबादचीनचे उपराष्ट्रपती ली. इयानचो यांच्या अजिंठा लेण्यांना दिलेल्या भेटीच्या दौऱ्यात खड्डेमय औरंगाबाद- अजिंठा रस्त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची नाचक्की झाली आहे. परराष्ट्र खात्याने खराब रस्त्याबाबत राज्य शासनाकडे तक्रार केल्यानंतर बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्या पथकाने मंगळवारी तातडीने औरंगाबाद ते फर्दापूर रस्त्याची पाहणी केली.दौऱ्यात गैरहजर राहिलेल्या व फोनवरुनही संपर्क होऊ न शकलेल्या अधीक्षक अभियंता यू. के. आहेर यांना सक्तीची रजा देत १० नोव्हेंबरपर्यंत त्यांचा रजेचा अर्ज न आल्यास निलंबित करण्याचे आदेश दिले. चीनच्या उपराष्ट्रपतींनी औरंगाबाद दौऱ्यात ४ नोव्हेंबरला अजिंठा लेण्यांना भेट दिली होती. ली. इयानचो हेलिकॉप्टरने अजिंठ्याला जाणार होते. त्यामुळे बांधकाम विभागाची यंत्रणा निर्धास्त होती; परंतु परराष्ट्र खात्याकडून हेलिकॉप्टरने प्रवासाची परवानगी न मिळाल्याने इयानचो कारने लेणी पाहण्यासाठी गेले. चाळण झालेल्या रस्त्यावरून त्यांचा ताफा गेल्यामुळे बांधकाम विभागाची लक्तरे मात्र वेशीवर टांगली गेली. परराष्ट्र खात्याने खराब रस्त्याची गंभीर दखल घेत, राज्य सरकारकडे तक्रार केल्याने या दुर्लक्षित रस्त्याच्या पाहणीचा दौरा अचानक निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या दौऱ्याबाबत अतिरिक्त मुख्य सचिव कुलकर्णी म्हणाले की, मी मराठवाड्यातील सर्व रस्त्यांची पाहणी करीत असून, जानेवारी २०१६ पर्यंत राज्य खड्डेमुक्त करण्यात येणार आहे. जागतिक पर्यटन स्थळाचा रस्ता एवढा खराब असताना त्याचा दरमहा आढावा घेतला जात नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. डिसेंबरमध्ये तातडीने या रस्त्याची सरफेसिंग करण्यासाठी त्यांनी ३० कोटी रुपये मंजूर केले.कनिष्ठ, उपअभियंता, कार्यकारी अभियंते काय करतात, असा सवालही कुलकर्णी त्यांनी केला. कंत्राटदारांना केवळ ब्लॅकलिस्ट करण्याऐवजी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी मुख्य अभियंता प्रवीण किडे यांना दिले. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही.जी. बोडखे, मुख्य अभियंता हेमंत पगारे, उपअभियंता अशोक ससाणे, मधुसूदन कांडलीकर त्यांच्यासोबत होते.