पालिकेचे नुकसान करणा:या ठेकेदारावर स्थायीची मेहेरबानी

By Admin | Updated: September 4, 2014 00:33 IST2014-09-04T00:33:13+5:302014-09-04T00:33:13+5:30

डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने मागविलेल्या निविदामध्ये सेवाकर वगळून भरलेल्या कमी दराच्या निविदा अपात्र ठरविण्यात आल्या.

Damage to the corporation: permanent settlement on the contractor | पालिकेचे नुकसान करणा:या ठेकेदारावर स्थायीची मेहेरबानी

पालिकेचे नुकसान करणा:या ठेकेदारावर स्थायीची मेहेरबानी

पुणो : डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने मागविलेल्या निविदामध्ये सेवाकर वगळून भरलेल्या कमी दराच्या निविदा अपात्र ठरविण्यात आल्या. मात्र, आरोग्य विभागाच्या कामाला सेवाकर लागू नसल्याचे लक्षात आल्यानंतर स्थायी समितीने जादा दराच्या ठेकेदारालाच सेवाकर वगळून मंजुरी दिली. पुणोकरांचे विश्वस्त म्हणून काम करणारे स्थायी समितीचे सदस्य ठेकेदारावर उदार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 
आरोग्य विभागातील कीटक प्रतिबंधक विभागातील इनडोअर व्हेक्टर कंट्रोल प्रोग्रॅम राबविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. घरोघरी जाऊन पाणी साठविण्याच्या ठिकाणी व टाकीचे पाणी करणो, त्यानुसार कीटकांचा प्रादुर्भाव होणा:या ठिकाणी शोधून औषधफवारणी करणो, यासाठी पाच ठेकेदारांना निविदा दाखल केल्या होत्या. मात्र, केंद्र शासनाच्या नियमानुसार आरोग्य व स्वच्छता विभागासाठी सेवाकराची अट नाही. त्याविषयी अनभिज्ञ असलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने तीन निविदाधारकांनी सेवाकर भरला नसल्याने त्यांचे दर किमान वेतन दरापेक्षा कमी आले म्हणून त्यांना अपात्र ठरविले. तर सेवाकरासह जादा दराच्या निविदाधारकांना पात्र ठरविण्यात आले होते. 
दरम्यान, आरोग्य विभागाशी संबंधित कामांना सेवाकराची सवलत असल्याचा प्रकार उजेडात आला. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने व स्थायी समितीने हुशारी दाखवीत जादा दर देणा:या ठेकेदाराला सेवाकर वगळून कामे देण्यास मंजुरी दिली. मात्र, ठेकेदारावर मेहेरबानी करण्यासाठी त्याला पुन्हा प्रशासकीय मान्यता घेतली नाही. तसेच, सेवाकरासाठी अगोदर ज्या ठेकेदारांना अपात्र ठरविले, त्यांनाही निविदा देताना विचारात घेतले नाही. त्यावरून स्थायी समिती पुणोकरांचे पैसे ठेकेदारांना देण्यासाठी उदार झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे महापालिकेचे नुकसान होत आहे. त्यामुळे जादा दराची मंजूर निविदा 
रद्द करण्याची मागणी आयुक्त 
कुणाल कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
 
स्थायी समितीमध्ये आरोग्य विभागाकडून आयत्यावेळी इनडोअर व्हेक्टरची निविदा दाखल झाली. त्या वेळी सेवाकर वगळून त्याच ठेकेदाराला काम देण्याविषयी प्रशासनाने सूचना केली. अगोदरच्या कमी दराच्या ठेकेदारांनी दराचे विश्लेषण निविदेमध्ये दिले नसल्याने त्यांना अपात्र ठरविल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
- बापूराव कण्रे, 
अध्यक्ष, स्थायी समिती

 

Web Title: Damage to the corporation: permanent settlement on the contractor