जामखेड (जि.अहमदनगर) : राज्यात दलित व महिला असुरक्षित असून, वर्षभरात १६४७ दलितांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत़ बिहार व उत्तर प्रदेशाला राज्याने मागे टाकले आहे. याबाबतीत राज्याचा देशात प्रथम क्रमांक आहे. १२ वर्षांपासून गृहमंत्री घटना घडली की ते फास्ट ट्रॅक न्यायालय नियुक्त करू म्हणतात. त्यांना कोणी रोखले आहे. घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा नेते खा. गोपीनाथ मुंडे यांनी केली.दलित युवक नितीन आगे याच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर खा. मुंडे यांनी आगे कुटुंबाची भेट घेऊन विचारपूस केली. खा. मुंडे म्हणाले, नितीन आगे याची हत्या ज्या पद्धतीने झाली तो पूर्वनियोजित कट होता. या हत्येचा तीव्र शब्दात निषेध करतो. दलित व महिलांवर अत्याचारा करणार्या गुन्हेगारांना शिक्षा होत नाही. अटकेचे प्रमाण व खटला ज्या पद्धतीने चालवला पाहिजे. त्या पद्धतीने होत नाही. त्यामुळे आरोपी निदार्ेष सुटतात. टक्केवारीच्या हिशोबात फक्त ०.३ टक्के गुन्हेगारांना शिक्षा होते, असे मुंडे म्हणाले़ (तालुका प्रतिनिधी)
राज्यात दलित व महिला असुरक्षित! - गोपीनाथ मुंडे
By admin | Updated: May 7, 2014 21:10 IST