शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

राज्यातील दूध व्यावसायिकांची शासनाकडे २५ कोटींची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 20:18 IST

राज्यातील तीन रुपयांच्या अनुदानापोटी सहा डेअर्‍यांचे एकूण २५ कोटी ६९ लाख रुपये थकीत आहे ही वस्तुस्थिती आहे

ठळक मुद्देपुणे विभागातील खासगी डेअर्‍यांची वीस कोटींची थकबाकी

पुणे : भाजप सरकारच्या काळात दुग्ध उद्योगांना अडचणीत मदत करण्यासाठी गायीच्या दुधाला प्रति लिटरला ३ रुपये अनुदान योजना राबविण्यात आली.या योजनेनुसार शासनाकडे तब्बल २५  कोटी रुपयांचे अनुदान अद्यापही थकीत आहे. त्यामुळे दुग्ध उद्योगाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. हे थकीत अनुदान त्वरित मिळावे अशी मागणी दूध प्रकल्प मालकांकडून करण्यात आली आहे. यामध्ये एकट्या पुणे विभागातील खाजगी डेअर्‍यांची वीस कोटीची थकबाकी शासनाकडे आहे. याबाबत राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के व कात्रज दूध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे यांनी सांगितले की, दुधाचे दर घटल्याने मागील भाजप सरकारच्या काळात गायीच्या ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाला प्रति लिटरला २५ रुपये दर निश्चित करण्यात आला. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात लिटरला ५ रुपये अनुदान होते. नंतरच्या कालावधीत ते लिटरला ३ रुपये आणि दूध डेअर्‍यांकडून २२ रुपये याप्रमाणे शेतकर्‍यांना लिटरला २५ रुपये भाव देण्यात आलेला आहे. सध्या गायीच्या दुधाचे खरेदी दर लिटरला वीस रुपयांपर्यंत खाली आलेले आहेत. तर सहकारी संघांकडून पंचवीस रुपये भाव दिला जात आहे. थकीत अनुदानासाठी डेअरी उद्योगाकडून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, अद्याप थकीत अनुदान मिळत नसल्याने अडचणीमध्ये अधिकच भर पडली आहे. कोरोना महामारी मुळे अगोदरच अडचणीत असलेल्या दूध संघांच्या अडचणीमध्ये यामुळे अधिकच भर पडली आहे. दरम्यान राबविण्यात येणारी दूध रुपांतरण योजना बंद झालेली आहे. तसेच शासनाकडून दूध अनुदान अथवा मदतीबाबतबाबत ठोस उत्तर मिळत नाही. दुसरीकडे दूध पावडरचा प्रति किलोचा भाव १५० ते १६० रुपये तर बटरचा भाव २२० ते २३० रुपये आहे. त्यामुळे थकित अनुदानाची रक्कम तत्काळ देवून डेअरी उद्योगास शासनाने अडचणीच्या काळात दिलासा दयावा, अशी मागणी म्हस्के यांनी केली.-----अनुदान प्राप्त झाल्यास त्वरीत वाटप राज्यातील तीन रुपयांच्या अनुदानापोटी सहा डेअर्‍यांचे एकूण २५ कोटी ६९ लाख रुपये थकीत आहे ही वस्तुस्थिती आहे. या योजनेतील मागणीनुसार दुग्ध आयुक्तालयात अनुदान मागणीचा प्रस्ताव यापुर्वीच गेलेला आहे. अनुदान प्राप्त होताच वितरित करण्यात येईल.- राजेंद्र मोहोड , प्रादेशिक दुग्धविकास अधिकारी

टॅग्स :PuneपुणेmilkदूधState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी