दाते पंचांग.. लोकल, ग्लोबल टू पर्सनल !
By Admin | Updated: November 9, 2014 02:08 IST2014-11-09T02:08:02+5:302014-11-09T02:08:02+5:30
कै. लक्ष्मणशास्त्री दाते यांनी 1916-17 या वर्षासाठीचं पंचांग काढलं तेव्हा ते पंचक्रोशीपुरतं मर्यादित होतं. दळणवळणाची साधनं वाढल्यानंतर पंचांगाने पंचक्रोशीची हद्द ओलांडली.

दाते पंचांग.. लोकल, ग्लोबल टू पर्सनल !
रवींद्र देशमुख - सोलापूर
कै. लक्ष्मणशास्त्री दाते यांनी 1916-17 या वर्षासाठीचं पंचांग काढलं तेव्हा ते पंचक्रोशीपुरतं मर्यादित होतं. दळणवळणाची साधनं वाढल्यानंतर पंचांगाने पंचक्रोशीची हद्द ओलांडली. त्यातील वेळांच्या कोष्टकाचा उपयोग करून अन्य शहरांसाठीही ते उपयुक्त ठरू लागले. इंटरनेटचे युग सुरू झाल्यानंतर पंचांग ग्लोबल झाले अन् आता मोबाइल, अॅप्स् तसेच पेपरलेसच्या जमान्यात दाते पंचांग पर्सनल झाले.. पंचांगकर्ते मोहनराव दाते आणि त्यांचे सुपुत्र ओम्कार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये पंचांगाच्या जन्माची कहाणी उलगडली़
कै. लक्ष्मणशास्त्रींना महाराष्ट्र नानाशास्त्री दाते या नावाने ओळखायचा. त्यांनी पंचांग सुरू केलं तेव्हा पंचांगामधील गणितामध्ये एकवाक्यता नव्हती.
लोकमान्य टिळक म्हणायचे, पंचांग हे आकाशाचा आरसा असला पाहिजे, लोकमान्यांचं हे विधान नानाशास्त्रींना प्रेरणा देऊन गेले. नानांनी 1916-17 या वर्षासाठीचं पहिलं पंचांग काढलं. कोल्हापुरातल्या आर्यभूषण प्रेसमधून छापून घेतलं. आता 1क्क्व्या पंचांगाचे काम पूर्ण केले असून, 9 नोव्हेंबर रोजी सोलापुरात त्याचा प्रकाशन सोहळा होत आहे.
मोहनराव म्हणाले, पंचांगाचे गणित सोडविण्यासाठी अनेक पाय:या असतात. उत्तरार्पयत पोहोचण्यासाठी लांबलचक कागद लागे. गणित सोडवताना नानांची मान आणि
कंबर दुखत असे; मग त्यांनी भिंतीवर गणित सोडवायला सुरुवात केली. भिंतीचा कागद केला. नानांचे सुपुत्र कै. धुंडीराजशास्त्री दाते (अण्णाशास्त्री) यांनी या कामात लक्ष घालायला सुरुवात केली तेव्हा आधुनिकतेचं पाऊल टाकलं. ओम्कार म्हणाले, 1975पासून दाते पंचांगाची अशी प्रतिमा व्हायला लागली. छपाईच्या तंत्रत सुधारणा झाल्यानंतर पंचांगात आम्ही कोष्टकं द्यायला सुरुवात केली.
तुरुंगातून निघाले पंचांग!
आणीबाणीला विरोध केल्यामुळे धुंडीराजशास्त्री दाते यांना नाशिकच्या तुरुंगात ठेवले होते. ते भारत सरकारच्या कॅलेंडर रिफॉर्म कमिटीवर काम करायचे. आणि भारत सरकारचे कॅलेंडर काढण्याची जबाबदारी अण्णांवर होती. तुरूंगात असल्यामुळे 1976-77चे पंचांग निघणो अशक्य होते. भारत सरकारचेही कॅलेंडर प्रसिद्ध होऊ शकत नव्हते. त्या वेळी सरकारने नाशिक तुरुंगात राहून कॅलेंडरचे काम करण्याची विशेष परवानगी दिली अन् दाते पंचांग, सरकारी कॅलेंडर प्रसिद्ध झाले.