'डॅडी'ला पुन्हा पॅरोल, 21 ऑक्टोबरला येणार तुरूंगाबाहेर

By Admin | Updated: October 17, 2016 22:28 IST2016-10-17T22:15:24+5:302016-10-17T22:28:54+5:30

कुख्यात गुंड डॅडी उर्फ अरुण गवळी पुन्हा एकदा पॅरोलवर तुरुंगाबाहेर येणार आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गवळीला पॅरोल रजा मंजूर

'Daddy' to be back on parole, October 21 | 'डॅडी'ला पुन्हा पॅरोल, 21 ऑक्टोबरला येणार तुरूंगाबाहेर

'डॅडी'ला पुन्हा पॅरोल, 21 ऑक्टोबरला येणार तुरूंगाबाहेर

ऑनलाइन लोकमत

नागपूर , दि. 17 - कुख्यात गुंड डॅडी उर्फ अरुण गवळी पुन्हा एकदा पॅरोलवर तुरुंगाबाहेर येणार आहे.  उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गवळीला पॅरोल रजा मंजूर केली आहे.  

गवळीची पत्नी आशा आजारी असल्याने गवळीने तुरुंग प्रशासनाकडे पॅरोलची विनंती केली होती. मात्र,  तुरुंग प्रशासनाने पॅरोल नाकारल्याने गवळीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. 25 ऑक्टोबरला मुंबईतील रूग्णालयात अरुण गवळीच्या पत्नीवर शस्त्रक्रिया होणार आहे. 
 
त्यामुळे 21 ऑक्टोबरला गवळी तुरुंगातून पॅरोलवर बाहेर येणार आहे.  2 नोव्हेंबरला पुन्हा तुरुंगात परतण्याचे आदेशही नागपूर खंडपीठाने त्याला दिले आहेत.
 

Web Title: 'Daddy' to be back on parole, October 21