शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 21:26 IST

Dada Bhuse News: तृतीय भाषा म्हणून कोणतीही भाषा बंधनकारक नसून हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक असतील, असे दादा भुसे यांनी म्हटले आहे.

Dada Bhuse News: राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्येमराठी भाषा बंधनकारक विषय म्हणून शिकवण्यात येत असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भविष्यातील ‘अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट’ या मूल्यमापनाच्या संकल्पनेचा विचार करुन आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी केली जाईल. यामध्ये तृतीय भाषा म्हणून कोणतीही भाषा बंधनकारक नसून हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक असतील, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांशी बोलताना दादा भुसे म्हणाले की, इंग्रजी भाषा ही अनेक वर्षांपासून राज्यमंडळाच्या शाळांमध्ये द्वितीय भाषा म्हणून स्वीकृत असून इतर मंडळांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी भाषेसोबत मराठी आणि हिंदी भाषा शिकविण्यात येतात. राज्य सरकारने तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही सक्ती न करता पालक व विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार भारतीय भाषांमधून निवड करण्याचा पर्याय दिला आहे. कोणतीही विशिष्ट तिसरी भाषा शिकण्याची सक्ती नाही. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) 2022 मधील शालेय वेळेच्या नियोजनानुसार प्रथम भाषेस (मराठी) साप्ताहिक 10 तासिका सुचविल्या असून राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) 2024 मधील शालेय वेळेच्या नियोजनानुसार प्रथम भाषेसाठी (मराठी) साप्ताहिक 15 तासिका समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. तसेच तिसऱ्या भाषेसाठी साप्ताहिक फक्त पाच तासिका सुचविलेल्या आहेत. ज्या भाषेसाठी किमान 20 विद्यार्थ्यांची मागणी असेल, त्या भाषेसाठी शिक्षक नियुक्त केले जातील. तसेच 20 पेक्षा कमी विद्यार्थ्यांकरिता डिजिटल शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. इयत्ता पहिली आणि दुसरी मध्ये चित्र, गाणी, बडबड गीतांद्वारे आनंददायी मौखिक शिक्षण दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवीन पुस्तक छपाई करण्यात आलेली नाही

राज्यात मराठी माध्यम शाळांमध्ये इयत्ता पाचवीपासून हिंदी शिकवली जाते. हिंदी भाषेतील सध्या उपलब्ध असलेली पुस्तके ही दर वर्षीप्रमाणेच आवश्यक असलेली पुस्तके आहेत. हिंदीसह इतर भाषांसाठी नवीन पुस्तक छपाई करण्यात आलेली नाही. राज्य मंडळाच्या मराठी व इंग्रजी माध्यमांव्यतिरिक्त इतर भाषिक शाळांमध्ये मातृभाषा, मराठी आणि इंग्रजी असे त्रिभाषा सूत्र यापूर्वीपासून लागू आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे त्रिभाषा सूत्र अनेक राज्यांमध्ये स्वीकारले गेले आहे. त्यानुसार दोन भारतीय भाषा व एक विदेशी (इंग्रजी) भाषा शिकवण्याची शिफारस आहे. मेंदूविज्ञान व बालमानसशास्त्रानुसार 2 ते 8 वयोगटातील मुलांमध्ये भाषिक कौशल्य आत्मसात करण्याची सर्वोच्च क्षमता असते, असे दादा भुसे यांनी सांगितले.

दरम्यान, भविष्यामध्ये संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येणाऱ्या ॲकेडमिक बँक ऑफ क्रेडिट (ABC) या मूल्यमापनाच्या संकल्पनेमध्ये जी मार्गदर्शक तत्वे निर्गमित करण्यात आली आहेत, त्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याने किती विषय किंवा कला शिकलेल्या आहेत आणि त्यासाठी त्याने किती वेळ दिलेला आहे यावरुन त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षणासाठीचे पॉईंट्स मिळण्याची व्यवस्था होणार आहे, याद्वारे जर सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा इयत्ता पहिलीपासून शिकवली तर इयत्ता सहावी वर्गापर्यंत कौशल्य प्राप्त होतील आणि पुढे त्यांना भाषा विषयाचे क्रेडिट पॉईंट्स मिळतील. क्रेडिट पॉईंट्सची प्रत्येक विद्यार्थ्याची स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर असेल. येत्या 8 ते 10 वर्षांत या त्रिभाषा सूत्राचे सकारात्मक परिणाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशपातळीवर दिसून येतील, असे मंत्री दादा भुसे यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Educationशिक्षणhindiहिंदीmarathiमराठीSchoolशाळा