शहरं
Join us  
Trending Stories
1
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
2
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
3
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
4
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
5
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
6
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
7
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
8
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
9
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
10
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
11
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
12
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
13
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
14
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
15
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
16
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
17
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
18
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
19
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
20
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला

पप्पा, लवकर घरी परत या.. मी तुमची वाट बघतेय; मुलीच्या आर्त हाकेने बापाला मृत्यूच्या दाढेतून खेचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 06:10 IST

पत्नीचा ५ टक्के आशावाद फळाला आला..., ही कहाणी आहे आरमोरी तालुक्यातील ठाणेगावच्या देवानंद बोरकर यांची. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते ब्रम्हपुरीला खासगी रुग्णालयात भरती झाले. पहिल्या दिवशी काहीच त्रास नव्हता. पण, दुसऱ्या दिवसापासून ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ लागली. मग...

 महेंद्र रामटेके -

आरमोरी (जि. गडचिरोली) : ‘पप्पा, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही लवकर घरी परत या... मी तुमची वाट बघत आहे !’ सर्व परिस्थिती विपरीत दिसत असतानाही मुलीची ती आर्त हाक त्यांना जगण्याची नवी उमेद देत होती. कुटुंबासाठी तरी आपण जगलोच पाहिजे, असा ठाम निश्चय त्यांनी मनाशी केला आणि सीटी स्कोअर १८, ऑक्सिजन ७० असताना तब्बल १७ दिवस कोरोनाशी लढा देत विजयी मुद्रेने ते घरी परतले.ही कहाणी आहे आरमोरी तालुक्यातील ठाणेगावच्या देवानंद बोरकर यांची. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते ब्रम्हपुरीला खासगी रुग्णालयात भरती झाले. पहिल्या दिवशी काहीच त्रास नव्हता. पण, दुसऱ्या दिवसापासून ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ लागली. डॉक्टरांनी गडचिरोली किंवा नागपूरला जाण्याचा सल्ला दिला. त्यांना गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत त्यांचा सीटी स्कोअर वाढून १८वर गेला तर ऑक्सिजन लेव्हल ७०वर आली. थेट आयसीयूमध्ये भरती केले तेव्हा ते पूर्ण खचून गेले होते. नागपुरात बेड उपलब्ध नसल्याने भंडारा येथे विचारणा केली. पण डॉक्टरांनी ९५ टक्के हमी नसल्याचे सांगत भरती करून घेण्यास नकार दिला होता. 

पत्नीचा ५ टक्के आशावाद फळाला आलाभंडाऱ्यातील डॉक्टरांनी भरती करण्यास नकार दिल्यानंतरही बोरकर यांच्या पत्नीने हिमतीने डॉक्टरांना केवळ ५ टक्के हमी घ्या आणि उपचार सुरू करा, ५ टक्के माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, अशी विनवणी केली. त्यामुळे उपचार सुरू झाले. ९ दिवस व्हेंटिलेटर व ८ दिवस ऑक्सिजनवर अशा कठीण परिस्थितीवर त्यांनी एक-एक दिवस मात केली. पत्नीने दिलेली हिंमत, मुलीने फोनवरून वेळोवेळी घातलेली आर्थ साद, मित्रमंडळींनी दिलेला धीर, विश्वास व आधार यामुळे कोरोनावर विजय मिळवू शकलो, असे देवानंद सांगतात.

आप्तस्वकीयांकडून हिंमत व आधार मिळणे गरजेचे-  ऑक्सिजन पातळी खालावलेले अनेक रुग्ण केवळ भीतीने घाबरून मृत्यूच्या दाढेत पोहोचतात.-  अशा स्थितीत त्यांचे नातेवाईक, कुटुंबातील व मित्र परिवारातील लोकांनी त्यांच्यापासून दूर न जाता त्यांना हिंमत, धीर व आधार दिल्यास नक्कीच कोरोनावर यशस्वी मात करता येते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर