स्त्री अर्भकाची शिर कापून हत्या

By Admin | Updated: January 24, 2017 04:13 IST2017-01-24T04:13:40+5:302017-01-24T04:13:40+5:30

नवजात अर्भकाचे क्रूरपणे शीर कापून धड मीरा रोडच्या जांगीड कॉम्प्लेक्समधील एका इमारतीसमोर टाकल्याचा खळबळजनक

Cut off the head of the infant and kill the baby | स्त्री अर्भकाची शिर कापून हत्या

स्त्री अर्भकाची शिर कापून हत्या

मीरा रोड : नवजात अर्भकाचे क्रूरपणे शीर कापून धड मीरा रोडच्या जांगीड कॉम्प्लेक्समधील एका इमारतीसमोर टाकल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. काशिमीरा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, अर्भकाचे शीर व अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.
जांगीड कॉम्प्लेक्समधील रस्त्यावर एका नवजात अर्भकाचा मृतदेह तेथील रखवालदाराला आढला. स्त्रीजातीच्या या एकदिवसीय अर्भकाचे केवळ धडच होते. क्रूरपणे त्याचे शीर कापलेले होते. या प्रकाराची माहिती मिळताच घटनस्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठवला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cut off the head of the infant and kill the baby