नगराध्यक्षांच्या घराबाहेर मृत्यूची कुंडली ठेवणारा संतोष पिंजण पोलीसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 23:07 IST2017-04-18T23:07:50+5:302017-04-18T23:07:50+5:30
लोणावळा शहराच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या मृत्यूचा काळ, वेळ, ठिकाण आणि कारण निच्छित करून तसे मृत्यू यंत्र आणि काळ्या बाहुलीची बांधलेली तिरढी यांचा उतारा

नगराध्यक्षांच्या घराबाहेर मृत्यूची कुंडली ठेवणारा संतोष पिंजण पोलीसांच्या ताब्यात
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 18 - लोणावळा शहराच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या मृत्यूचा काळ, वेळ, ठिकाण आणि कारण निच्छित करून तसे मृत्यू यंत्र आणि काळ्या बाहुलीची बांधलेली तिरढी यांचा उतारा त्याच्या घराच्या दरवाजापुढे ठेवणारा संतोष पिंजण ह्या लोणावळ्यातील व्यक्तीला लोणावळा शहर पोलीसांनी आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले.
अंधश्रद्धेचा कळस गाठणारी सदर घटना दोन दिवसांपुर्वी उघड झाल्यानंतर सर्व स्तरांतून या घटनेचा निषेध नोंदविला होता.
नगराध्यक्षा सुरेखा जाधव ह्या शिवसेनेचे नगरसेवक शिवदास पिल्ले यांच्या मुलाच्या लग्नासाठी केरळला गेल्या होत्या. त्यांच्या अनुपस्थितीत शनिवारी रात्री त्यांच्या घरासमोर असा घृणास्पद आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार घडला होता. सदर उताऱ्यात एका कागदावर सुरेखा जाधव यांच्या नावाचा उल्लेख असणारे एक मृत्यू यंत्र रेखाटण्यात आलेले आहे. त्यावर श्रीमती जाधव यांच्या मृत्यूची दिनांक, वेळ, ठिकाण व मृत्यु कसा होणार या सर्वांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये मंगळवार दिनांक २५ एप्रिल २०१७ रोजी सकाळी ११ वाजून ८ मिनिट या वेळी तुंगार्ली येथील नगरपरिषद कार्यालयात श्रीमती जाधव यांचा अटॅकने मृत्यू होणार असल्याचे स्पष्टपणे लिहिण्यात आले होते. लोणावळा पोलिसांना या घटनेची रविवारी सकाळी खबर मिळाल्यानंतर त्यांनी सदर उतारा त्या ठिकाणीवरून हटवला होता. सुरेखा जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करुन असा प्रकार करणार्यांवर कडक कारवाईची मागणी केली होती. आज रात्री त्या केरळवरुन घरी आल्यानंतर घराबाहेरील सिसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये संजय पिंजण हे दारासमोर उतारा ठेवताना दिसत आहे, तसेच पिंजण व त्यांचा मुलगा गाडीवरुन येताना व जाताना स्पष्ट दिसत असल्याने त्यांना तातडीने शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबात शहरात वार्यासारखी बातमी पसरल्याने जाधव समर्थकांनी शहर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत पिंजण याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.