शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सध्या मराठा समाज कुणासोबत महाविकास आघाडी की महायुती? अजित दादांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 12:17 IST

Maharashtra Assembly Election 2024 : यावेळी विधानसभा निवडणुकीत मराठा समाज नेमका कुणासोबत महाविकास आघाडी की महायुती? यासंदर्भात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टशब्दात भाष्य केले आहे... 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीत याचा मोठा फटका महायुतीला बसल्याचे मानले जाते. मात्र आता यावेळी विधानसभा निवडणुकीत मराठा समाज नेमका कुणासोबत महाविकास आघाडी की महायुती? याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यासंदर्भात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टशब्दात भाष्य केले आहे. 

अजित दादा म्हणाले, "आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यांत वेगवेगळ्या सर्वांसोबतच मराठा समाज राहिला आहे. इतर समाज एकतर्फी मतदान करतात. मात्र हा समाज असे कधी... कारण त्यांना राज्य चालवायचे आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचं राज्य आहे. एक आहे, जरांगेंचा काही परिणाम निश्चितपणे झालेला आहे. त्याचा फटका लोकसभेला विशेषतः मराठवाड्यात बसलेला आहे." दादा अबीपी न्यूज सोबत बोलत होते.

"विदर्भात तर देशमुखांनाही कुणबी सर्टिफेकेट आहे, आरक्षण आहे. तेथे डॉ. पंजाबराव देशमुख हायात असताना सर्वांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायला सांगितले. विदर्भाने प्रतिसाद दिला तेथे तो प्रश्न नाहीय. उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कुणबीची प्रमाणपत्र आहेत. कोकणातही कुणबीसमाज आहे. त्यांनाही कुणीबीची प्रमाणपत्र मिळातत. काही जणांनी कुणबीमध्ये लावून घेतलं नाही, कारण ते स्वतः आम्ही 96 कुळी आहोत, आम्ही नाही लावून घेणार, अशा पद्धतीने... काही ठिकाणी निवडणुकीला ओबीसीचं प्रममाणपत्र मिळावं म्हणूनही कुणबी लावून घेतल्याची उदाहरणंही आपल्यासमोर आहेत," असे अजित पवार म्हणाले. "देशाला स्वातंत्र्य मिळालं पण मराठवाड्याला निजामाच्या राजवटीत बराच काळ काम करावे लागले. यामुळे इतर भागाला जी संधी मिळाली तशी संधी मराठवाड्याला मिळाली नाही. यामुळे हैदराबादला जाऊन, त्याचे रेकॉर्ड आणून, नक्की काय आहे, काय करत होते, कुणबी म्हणजे कोण? तर जे शेतीवाडी करत होते, ते कुणबी, असे सर्व ते आहे. तेथे लोकांवर अन्याय झाला, अशी भावना निश्चितपणे आहे. ज्यांचा अभ्यास आहे त्यांचेही असे मत आहे. ते दुरुस्त करण्याचे काम आम्ही करत आहोत.  

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024vidhan sabhaविधानसभाMaratha Reservationमराठा आरक्षण