अवजड वाहनांना आजपासून १४ तास बंदी

By Admin | Updated: August 15, 2016 03:54 IST2016-08-15T03:54:56+5:302016-08-15T03:54:56+5:30

ठाणे शहर नियंत्रण वाहतूक शाखेने स्वातंत्र्यदिनीच शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व शहरांमध्ये अवजड वाहनांना २४ तासांसाठी बंदी घातली आहे

Cumbersome vehicles are allowed for 14 hours from today | अवजड वाहनांना आजपासून १४ तास बंदी

अवजड वाहनांना आजपासून १४ तास बंदी


ठाणे: वाहतूककोंडी सोडवण्यासाठी ठाणे शहर नियंत्रण वाहतूक शाखेने स्वातंत्र्यदिनीच शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व शहरांमध्ये अवजड वाहनांना २४ तासांसाठी बंदी घातली आहे. ही बंदी तब्बल तीन महिन्यांपर्यंत लागू राहणार आहे. तसेच काही ठिकाणी निर्बंधही घातले असून त्यावेळेत पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करीत शहरांतर्गत वाहतूक करायची असल्यास अशा वाहनांनी रात्री १० ते सकाळी ८ या वेळेत वाहतूक करता येणार आहे.
शहरात सर्व वाहनांना २४ तास प्रवेश असल्यामुळे शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडतो. या कोंडीत शाळेत जाणारी मुले, नोकरी धंद्यानिमित्ताने बाहेर पडणारी मंडळी, रुग्णवाहिका तसेच जीवनावश्यक सोयीसुविधा पुरवणारी छोटी वाहने अडकून पडतात. या वाहनांना सुकर मार्गक्रमण करण्यासाठी शहराबाहेरून येणाऱ्या अवजड वाहनांना (सहापेक्षा जास्त चाके असणाऱ्या वाहनांना) गर्दीच्या काळात शहराबाहेर रोखण्याचा एक महिन्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला होता.
याचदरम्यान, आलेले अभिप्राय आणि सूचनांनुसार पुन्हा वाहतूक चार भागांत विभागण्याचे ठरवून तीन महिन्यांसाठी नवीन अधिसूचना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी काढली आहे. (प्रतिनिधी)
>दोन टप्प्यांतील अवजड वाहतूक बंद
सकाळी ८ ते दुपारी ११ व सायंकाळी ५ते रात्री १० वाजेपर्यंत या दोन टप्प्यांत (सहापेक्षा जास्त चाक ी)अवजड वाहनांना १) राष्ट्रीय महामार्ग क्र मांक-३वरील वडपे-राजनोली-माणकोली-खारेगाव ते आनंदनगर टोलनाकामार्ग, २) राष्ट्रीय महामार्ग क्र मांक-४वरील दहिसर मोरी-कल्याण फाटा ते मुंब्राबायपासमार्गे खारेगाव टोलनाकादरम्यान ३) राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ४२ घोडबंदर रस्ता ४) बदलापूर-अंबरनाथ-काटईफाटा ५) म्हापे-शीळफाटा या पाच रस्त्यांवर बंदी घातली आहे. या वाहनांनी दुपारी ११ ते ५ आणि रात्री १० ते सकाळी ८ या दोन टप्प्यांत वाहतूक करता येणार आहे.
>१४ तास अवजड वाहतूक बंद
सकाळी ८ ते रात्री १० अशी १४ तास शहरातील चार प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांना १) भिवंडी-रांजनोलीनाका-दुर्गाडी-खडकपाडा (भिवंडी-मुरबाड रस्ता) २) राज्य महामार्ग क्र मांक ४० दुर्गाडी ते कल्याण फाटा (कल्याण-शीळफाटा रस्ता) ३) कापूरबावडी सर्कल-बाळकुम- कशेळी टोलनाका-अंजूरफाटा-वंजारपट्टी (भिवंडी-वाडा रस्ता)४) माणकोली-अंजूरफाटा-कारिवली-खारबांव-वसईरोडकडे जाणार रस्ता (चिंचोटी-अंजूरफाटा रस्ता) बंदी घालण्यात आली असून या मार्गावर रात्री १० ते सकाळी ८ या वेळात अवजड वाहनांना वाहतूक करता येणार आहे.

Web Title: Cumbersome vehicles are allowed for 14 hours from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.