शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

लॅण्ड, सॅण्ड, रेशन माफियांना चिरडून टाका

By admin | Updated: June 17, 2015 02:55 IST

कायद्याचे राज्य स्थापन करण्यासाठी मुजोर झालेल्या लॅण्ड, सॅण्ड आणि रेशन माफियांना चिरडून टाका, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : कायद्याचे राज्य स्थापन करण्यासाठी मुजोर झालेल्या लॅण्ड, सॅण्ड आणि रेशन माफियांना चिरडून टाका, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कोणी काही चुकीचे करत असले तर त्याच्यावर कडक कारवाई करा; सरकार पूर्ण ताकदीने तुमच्या पाठिशी उभे राहिल, असे आश्वासनही त्यांनी दिले. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची दोन दिवसांची महसूल परिषद पुण्यात यशदा येथे आयोजित करण्यात आली होती. फडणवीस यांच्या उपस्थितीत तिचा समारोप झाला. यावेळी महसूल मंत्री एकनाथ खडसे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षेत्रीय, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते. आपले कोणी काहीही करू शकत नाही, असे मुजोर माफियांना वाटते. त्यामुळे या माफियांना चिरडून काढण्यासाठी आवश्यक असलेलेल सर्व दल-बल पुरविले जाईल. कारवाई करताना काही अडचणी आल्या तर थेट माझ्याशी संपर्क करा. तुमच्या जिवाला धोका असल्यास तसा एसएमएस करा. योग्य संरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.सेवा हमी कायदाअंमलबजावणीत कोणती सबब नकोराज्य शासन सेवा हमी कायद्यात कोणतेही प्रकारची तडजोड करणार नाही. त्यामुळे या कायद्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांनी मनुष्यबळ कमी किंवा इतर काही अडचणी आहेत, अशी कोणती ही सबब खपवून घेणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तलाठी यांच्याकडील अनावश्यक दप्तर कमी करण्याबरोबरच काळानुसार महसूल कायद्यात काही बदल करण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस यांनी सांगतिले.न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या पोलीसांसह सर्वच अधिकाऱ्यांना निळा दिवा वापरावा लागत आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार कारवाई करण्यासाठी एखाद्या गावात गेल्यावर अ‍ॅम्ब्युलन्स आली की काय असे लोकांना वाटते. अंबर, लाल दिव्याचा धाक निळा दिव्यात नाहीत. त्यामुळे याबाबत पुनर्विचार करणार येईल, असे ते म्हणाले.