नियतीचा क्रूर खेळ, कन्यादानापूर्वीच वडिलांचा मृत्यू

By Admin | Updated: February 3, 2017 12:13 IST2017-02-03T12:12:31+5:302017-02-03T12:13:13+5:30

लाडक्या लेकीच्या लग्नाच्या पत्रिकेचे वाटप करण्यासाठी फुलगावाकडे निघालेल्या वधू पित्यासह दोघांचा अपघाती मृत्यू झाला आहे. भुसावळ येथील ही घटना आहे.

Cruelty of destiny, daughter's death before daughter-in-law | नियतीचा क्रूर खेळ, कन्यादानापूर्वीच वडिलांचा मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ, कन्यादानापूर्वीच वडिलांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

भुसावळ, दि. 3 - लाडक्या लेकीच्या लग्नाच्या पत्रिकेचे वाटप करण्यासाठी फुलगावाकडे निघालेल्या वधू पित्यासह दोघांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तालुक्यातील फुलगाव फाट्याजवळील ही घटना आहे. राजेंद्र सोनवणे (वय 45 वर्ष) आणि दगडू सोळुंखे (वय 40 वर्ष)अशी मृतांची नावे आहेत.
 
राजेंद्र सोनवणे यांच्या मुलीचा 16 फेब्रुवारीला विवाह सोहळा आहे. मुलीच्या लग्नाची पत्रिका नातेवाईकांना देण्यासाठी ते सकाळीच दगडू सोळुंखे यांच्यासोबत फुलगावाकडे उत्साहात निघाले होते. मात्र, प्रवासादरम्यान काळाने त्यांच्यावर घाला घातला.  बाईकवरुन जात असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने सोनवणे यांच्या बाईकला धडक दिली.
 
ही  धडक इतकी भीषण होती सोळुंखे यांचा जागीच मृत्यू झाला, तर  सोनवणे यांनी जळगावात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, अपघातग्रस्त बाईक,  ट्रक आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 
नियतीच्या या क्रूर खेळामुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काळाने घाला घातल्याने सोनवणे लाडक्या लेकीचे कन्यादान करू शकले नाहीत.   
 

Web Title: Cruelty of destiny, daughter's death before daughter-in-law