महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; यवतमाळच्या सारिका शाह ठरल्या मिसेस युनायटेड नेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 06:26 IST2019-11-18T02:37:01+5:302019-11-18T06:26:28+5:30

मिसेस युनायटेड नेशन्स किताब मिळविणाऱ्या भारतातील दुसऱ्या महिला

A crown of honor in the head of Maharashtra; Mrs Sarva Shah of Yavatmal becomes Mrs United Nations | महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; यवतमाळच्या सारिका शाह ठरल्या मिसेस युनायटेड नेशन्स

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; यवतमाळच्या सारिका शाह ठरल्या मिसेस युनायटेड नेशन्स

यवतमाळ : पंजाबमधील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीत झालेल्या स्पर्धेत यवतमाळ येथील डॉ. सारिका महेश शाह या ‘मिसेस युनायटेड नेशन-२०१९’च्या मानकरी ठरल्या. हा किताब मिळविणाऱ्या त्या भारतातील दुसऱ्या महिला आहेत. या आधी २०१८ मध्ये मिसेस निपासिंग यांनी ही स्पर्धा जिंकली होती.

गेल्या १५ वर्षांपासून जगातल्या विविध देशात होणारी ही स्पर्धा यावर्षी पहिल्यांदाच भारतात झाली. त्यात ऑस्ट्रेलिया, कुर्दिस्तान, रशिया, दक्षिण आफ्रिका, केनिया, अमेरिका (यूएसए), युरोशिया या देशातील स्पर्धक सहभागी झाले होते. डॉ. सारिका महेश शाह मिसेस कॅटेगिरीमधून भारताचे प्रतिनिधित्व करत मिसेस युनायटेड नेशन-२०१९ च्या विजेत्या ठरल्या.

या आधी त्यांनी मिसेस इंडिया वर्ल्ड, मिसेस इंडिया युनिव्हर्स अशा स्पर्धेत फर्स्ट रनरअपचा मान पटकावला आहे. दिल्ली येथे मिसेस दिवा आॅफ इंडिया इंटरनॅशनल या स्पर्धेतही विजेत्या ठरल्या.

Web Title: A crown of honor in the head of Maharashtra; Mrs Sarva Shah of Yavatmal becomes Mrs United Nations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.