सिनेमाप्रेमी मालेगावकरांची चित्रपटगृहावर उसळली गर्दी; ना मास्क, ना शारीरिक अंतराचे भान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 03:57 AM2021-03-21T03:57:58+5:302021-03-21T07:04:56+5:30

कोरोना नियमांना केराची टोपली दाखवत सिनेमाप्रेमी मालेगावकरांनी चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर गर्दी केली. ना मास्क, ना सुरक्षित अंतर अशा या हुल्लडबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Crowds of movie lovers flocked to the cinema; No mask, no sense of physical distance | सिनेमाप्रेमी मालेगावकरांची चित्रपटगृहावर उसळली गर्दी; ना मास्क, ना शारीरिक अंतराचे भान

सिनेमाप्रेमी मालेगावकरांची चित्रपटगृहावर उसळली गर्दी; ना मास्क, ना शारीरिक अंतराचे भान

Next

मालेगाव :  कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे क्षमतेच्या ५० टक्केच व्यक्तिंना प्रवेश देण्याचे निर्देश असताना येथील एका चित्रपटगृहावर शुक्रवारी सिनेमाप्रेमी मालेगावकरांची मोठी गर्दी उसळली. प्रेक्षकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत  तिकीटबारीवर गर्दी केली होती. याप्रकरणी येथील छावणी पोलीस ठाण्यात चित्रपट व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

कोरोना नियमांना केराची टोपली दाखवत सिनेमाप्रेमी मालेगावकरांनी चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर गर्दी केली. ना मास्क, ना सुरक्षित अंतर अशा या हुल्लडबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकाराची कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी गंभीर दखल घेतली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. 

चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा प्रस्ताव
मालेगावी सध्या  ८७८ तर तालुक्यात २१८  कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत १८४  जणांचा मृत्यू झाला आहे. मास्कविना प्रवेश नाकारणे, प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक केले आहे. मात्र, या आदेशाला शुक्रवारी वाटाण्याचा अक्षता लावण्यात आल्या. त्यामुळे चित्रपटगृहे बंद ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Crowds of movie lovers flocked to the cinema; No mask, no sense of physical distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.