शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी हल्लाबोल मोर्चा, शरद पवार यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 18:11 IST

 हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी नागपुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या हल्लाबोल मोर्चाला संबोधित करताना माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली.

नागपूर -  हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी नागपुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या हल्लाबोल मोर्चाला संबोधित करताना माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली. झोपलेल्या सरकारला जागं करण्याठी आज हा हल्लाबोल मोर्चा काढावा लागल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बिनकामाच्या सरकारला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात असहकार पुकारावा, वीज बिल, कर भरू नयेत असे आवाहन त्यांनी केले.तब्बल 37 वर्षांनंतर शरद पवार आपल्या वाढदिवसा दिवशी एखाद्या मोर्चात सहभागी झाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या या हल्लाबोल मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर जनसहभाग दिसून आला होता. या मोर्चानंतर आयोजित सभेसाठी गुलाम नबी आझाद, शरद पवार यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी संबोधित करताना शरद पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. " झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी हा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला आहे. आज राज्यातील शेतकरी विविध समस्यांनी त्रस्त आहे. कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. बळीराजामध्ये सरकार उलथून टाकण्याची ताकद असते. तुम्ही सरकारविरोधात असहकार पुकारा. वीज बील भरू नका. कर भरू नका," असे आवाहन शरद पवार यांनी केले. आज तब्बल 37 वर्षांनंतर शरद पवार हे वाढदिवसादिवशी नागपूरच्या रस्त्यावर आंदोलनात उतरल्याचे पहायला मिळाले.  शरद पवार यांनी 1980 मध्ये मुख्यमंत्री ए. आर. अंतुले सरकारच्याविरोधात ऐतिहासिक मोर्चा काढला होता. तेव्हा शरद पवार यांनी पुलोदचे नेतृत्व केले होते. या मोर्चाला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला होता.  सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकरी आणि सामान्यांच्या विषयांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत काँग्रेस-राष्ट्रवादीने हल्लाबोल मोर्चाचं आयोजन केलं आहे. दरम्यान, काल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर ‘हल्लाबोल’ केला. शेतक-यांच्या कर्जमाफीवरून गोंधळ घालणा-या विरोधकांना ठणकावताना, शेतक-यांच्या आत्महत्या हे तुमचे पाप आहे, असे त्यांनी सुनावले. विरोधकांकडे दुर्लक्ष करीत सरकारने संपूर्ण कामकाजही उरकले. विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफीचा लाभ शेतक-यांना मिळाला नसल्याचे सांगत चर्चेची मागणी केली. ती नाकारून विधानसभाध्यक्षांनी कामकाज पुकारताच विरोधकांनी घोषणा सुरू केल्या. त्यांनी कर्जमाफी फसवी असून दीड हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्याचा ठपका ठेवला. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना एकरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूरNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७