इच्छादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

By Admin | Updated: October 9, 2016 18:17 IST2016-10-09T18:17:33+5:302016-10-09T18:17:33+5:30

महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील इच्छापूर येथील इच्छादेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गर्दी होत आहे.

The crowd of devotees for the visit of Lord Vishnu Devi | इच्छादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

इच्छादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 9 - महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील इच्छापूर येथील इच्छादेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गर्दी होत आहे. इच्छादेवीचे प्राचीन मंदिर सातपुडा पर्वतावर इच्छापूर गावापासून दक्षिणेला सुमारे दीड किमी अंतरावर आहे. मंदिराच्या विकास कामासाठी मध्य प्रदेश शासनाने एक कोटीचा निधी दिला आहे. यातून बरीचशी विकासकामे केली गेली. मंदिरात वर्षातून दोन वेळा मोठे उत्सव साजरे केले जातात.
चैत्र शुद्ध नवमीला देवीची मोठी यात्रा भरते. यात्रेच्या एक दिवस आधी निमसाड्या कार्यक्रम पाहण्याजोगा असतो. मध्य प्रदेश व महाराष्ट्रातून देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. तापी महात्म्याच्या सातव्या अध्यायात इच्छापूर महात्म्य वर्णिले आहे. एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. इच्छादेवी देवस्थान ५०० वर्ष प्राचीन आहे. त्याचे निर्माण कार्य एका मराठा सुभेदाराने केले. सातपुडा पर्वतावर १२५ फूट उंचावर मंदिर आहे.
भाविकांच्या सोयीसाठी १९८४ मध्ये ट्रस्टची स्थापना करण्यात आली. मंदिराच्या दक्षिणेला पर्वताच्या पायथ्याशी एका महान तीर्थ आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष फकिरा तोरे, उपाध्यक्ष भागवत महाजन, सचिव महेश पातोंडीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: The crowd of devotees for the visit of Lord Vishnu Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.