शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 00:05 IST

राजगड पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने पुण्याहून सातारच्या दिशेने चाललेल्या इनोवा क्रिस्टा गाडी नंबर MH 45 AS 2526 पकडून तपासणी केली.  

पुणे - विधानसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाचं भरारी पथक विविध चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करत असते. त्यात खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एका खासगी वाहनात कोट्यवधीची रोकड सापडल्याचं उघड झालं आहे. ही रक्कम सांगोला इथं नेण्यात येत होती. सध्या पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी हे या प्रकाराचा तपास करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या रोकडमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. 

पुणे सातारा महामार्गावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एका वाहनात कोट्यवधीची रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम जवळपास ५ कोटींपर्यंत असण्याचा अंदाज आहे. पुणे सातारा महामार्गावरील रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. सोमवारी दुपारपासून पोलिसांनी खेड शिवापूर टोल नाक्याजवळ नाकाबंदी केली होती. त्यानंतर रात्रीच्या सुमारास एक संशयित वाहन पोलिसांना आढळले. पोलिसांनी हे वाहन रोखून त्यात तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. सध्या खेड शिवापूरच्या राजगड पोलीस ठाण्यात अधिक तपास सुरू आहे.

महाराष्ट्र मध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजगड पोलिसांकडून करण्यात आलेली ही मोठी कारवाई असून या रोख रकमे संदर्भात रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम चालू होते ही रक्कम नेमकी कोणाची व कशासाठी नेली जात होती याची पडताळणी चालू असल्याची माहिती समोर येत आहे. गाडीमधून प्रवास करणाऱ्या चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर ती रोख रक्कम निवडणूक काळामध्ये सापडल्यामुळे खेड शिवापुर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

संजय राऊतांचं सत्ताधारी आमदाराकडे बोट

या घटनेबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत सांगोला येथील आमदार शहाजी पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलंय की, मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले!हे आमदार कोण? काय झाडी…काय डोंगर…मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले. १५ कोटीचा हा पहिला हप्ता, काय बापू..किती हे खोके? असा चिमटा राऊतांनी काढला आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliceपोलिसSanjay Rautसंजय राऊत