शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
4
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
5
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
6
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
7
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
8
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
10
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
11
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
12
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
13
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
14
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
15
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
16
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
17
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
18
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
19
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
20
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

शालेय पोषण आहाराचा कोट्यवधीचा बारदाना दुर्लक्षित

By admin | Updated: May 29, 2014 01:13 IST

तांदुळाचा बारदाना योजनेच्या प्रारंभापासूनच गोळा न केल्याने या करोडो रुपयांच्या बारदान्याच्या हिशेबाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आकोट : संपूर्ण राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरविण्यात येणार्‍या तांदुळाचा बारदाना योजनेच्या प्रारंभापासूनच गोळा न केल्याने या करोडो रुपयांच्या बारदान्याच्या हिशेबाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांची शाळेत नियमित उपस्थिती राहावी आणि त्यांच्या मध्यान्ह भोजनाची सोय व्हावी, या दुहेरी हेतूने शासनाने शालेय पोषण आहाराची योजना कार्यान्वित केली. त्यासाठी भोजनाचे प्रमाण निश्‍चित करून प्रत्येक शाळेला तांदूळ तथा खिचडीकरिता लागणारे मसाल्याचे पदार्थ पुरवण्यात येतात. यामधील महत्त्वाचा घटक असलेला तांदूळ गोणपाटाच्या कट्टय़ात ५0 किलोच्या प्रमाणात पुरवण्यात येतो. यातील तांदूळ तथा अन्य किराणा मालाचा कागदोपत्री नीट हिशेब ठेवल्या जातो. त्यासाठी साठा पुस्तिकेत प्रत्येक वाणासाठी कॉलम आहेत; परंतु बारदाना जमा करण्याबाबत कुठेच उल्लेख नाही. परिणामी गोणपाटाच्या या कट्टय़ांचा हिशेब कुठेच ठेवल्या जात नाही. हा प्रकार अगदी योजना सुरू झाल्यापासूनच सुरू आहे. शासनानेही या बाबीकडे समूळ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे किमान ८ वर्षांंपासून या बारदान्याचे लाखो कट्टे गहाळ झालेले आहेत. बाजारात या खाली कट्टय़ांची किंमत १४ ते १६ रुपये आहे. बाजार भावाचा हा संदर्भ घेतल्यास आजवर शासनाचे करोडो रुपये मातीत गेले असल्याचे दिसून येते. शासनच विचारीत नाही म्हणून तर अधिकारी हिशेब मागीत नाही म्हणून खिचडीवाले शिक्षक या बारदान्याबाबत उदासीन आहेत; परंतु यातील काही बेरकी लोकांनी मात्र बारदान्याचे महत्त्व ओळखून हा बारदाना हातोहात लंपास केला आहे. काही शिक्षकांनी बारदाना गोळा करण्याचा प्रयास केला; परंतु जेथे विद्यार्थ्यांनाच बसण्यास वर्ग खोल्यांची मारामार आहे, तेथे बारदान्यासाठी एक संपूर्ण वर्गखोली का गुंतवून ठेवावी, हा सुज्ञ विचार करून त्या शिक्षकांनी बारदाना गोळा करण्याचा विचार त्यागला. जो बारदाना गोळा केला तो पायपुसणी म्हणून विद्यार्थी व शिक्षकांच्या पायदळी तुडविल्या गेला. यातून जो बारदाना वाचवला त्यावर उंदरांनी ताव मारून निरुपयोगी करून टाकला आहे. संपूर्ण राज्यातील शाळांमधून हा बारदाना बाजारात आणला असता, तर त्यापोटी शासनास करोडोचा लाभ झाला असता; परंतु शासन, अधिकारी तथा शिक्षकांच्या उदासीन धोरणाने करोडो रुपयांच्या बारदान्याची पुरती वाट लागली आहे. हा बारदाना सुरक्षित राहून त्यावर महसूल प्राप्त करण्यासाठी तांदूळ व किराणा मालासोबतच बारदान्याचा हिशेब ठेवणे अतिशय गरजेचे आहे. त्यासोबतच दरमहा गोळा केलेला बारदाना संकलित करून शासनानेच त्याच्या साठवणुकीची तथा सुरक्षेची हमी घेणे, हे शासनाच्या आर्थिक हिताचे आहे.